how to enroll for Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana 3000 ruppes pension per month
कामाची गोष्ट! फक्त ५५ रुपये खर्च करा; सरकार तुमच्या खात्यात दर महिन्याला ३००० रुपये टाकणार By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 4:19 PM1 / 10PM Kisan Samman Yojana: कोरोना संक्रमण काळात सामान्य लोकांसह, नोकरदार, उद्योजकांना मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत आहे. यामध्ये शेतकरी देखील काही वेगळ्या परिस्थितीत नाही. शेतमालाला उठाव नाही, दर नाही त्यात वाढलेली महागाई, औषधे आदी गोष्टी असतानाच सर्वत्र पूराचे संकट आलेले आहे. यामुळे पिके वाया गेली आहेत. (Pradhan Mantri Kisan Maan Dhan Yojana (PM-KMY) information in Marathi)2 / 10शेतकरी शेतात राब राब राबून कमी पैसे घेऊन लोकांचे पोट भरत असतो. त्याच्या हाती आयुष्याच्या संध्याकाळी काहीच राहत नाही. अशा शेतकऱ्यांच्या म्हातारपणीची सोय केंद्र सरकारने केली आहे. यासाठी तुम्ही शेतकरी असाल तक काम करावे लागणार आहे. 3 / 10जर तुम्ही किसान सन्मान निधीचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. तुम्हाला या योजनेचा मोठा फायदा होऊ शकतो. किसान मानधन योजनेनुसार सरकारद्वारे तुमच्या खात्यात महिन्याला ३००० रुपये येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, चला जाणून घेऊया. 4 / 10भारत सरकारच्या या योजनेचा लाभ त्याच शेतकऱ्यांना होणार आहे, जे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत. यासाठी तुमचे वय हे १८ ते ४० च्या आतमध्ये असायला हवे. या योजनेतून ६० वर्षांच्या शेतकऱ्यांना दर महिन्याला पेन्शन दिली जाते. 5 / 10छोट्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी केंद्राची ही योजना आहे. या योजनेनुसार ६० वर्षांवरील शेतकऱ्यांच्या खात्यात महिन्याला ३००० रुपये पाठविले जातात. ही रक्कम किसान सन्मान निधी योजनेपेक्षा वेगळी आहे. तिथे २००० रुपये पाठविले जातात. (3000 ruppes pension per month.)6 / 10जर तुम्ही शेतकरी आहात आणि जर तुमचे वय १८ ते ४० वर्षे मध्ये असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन भविष्याची तरतूद करू शकता. त्यासाठी आणखी एक अट म्हणजे तुमच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन असायला हवी. तेव्हाच तुम्हाला ६० वर्षांनंतर या योजनेचा लाभ मिळू शकेल. 7 / 10यासाठी तुम्हाला दर महिन्याला केवळ ५५ रुपये या योजनेत जमा करावे लागतील. जोवर तुमचे वय ६० वर्षे होत नाही तोवर तुम्हाला हे पैसे भरावे लागणार आहेत. 8 / 10या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. यामध्ये आधार कार्ड, ओळख पत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेतीचा सातबारा, बँक खात्याचे पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो लागेल. 9 / 10ही सर्व कागदपत्रे घेऊन त्याची झेरॉक्स काढून तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जन सेवा केंद्रामध्ये जावे लागणार आहे. तिथे तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे. यानंतर तुम्ही या योजनेत सहभागी होऊ शकता.10 / 10देशातील छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना सुरु केली आहे.या शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांचा लाभ मिळतो. ही रक्कम तीन हप्त्यांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. आणखी वाचा Subscribe to Notifications