How much gas is left in the LPG Gas cylinder? Take it with a wet cloth, this trick is awesome
LPG सिलेंडरमध्ये किती गॅस उरलाय? ओल्या कपड्याने घ्या जाणून, जबरदस्त आहे ही ट्रिक By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 4:52 PM1 / 5एलपीजी गॅसचा वापर बहुतांश जेवण बनवण्यासाठी केला जातो. चूल किंवा इंतर माध्यमांपेक्षा सिलेंडरवर जेवण करणे अधिक सोपे असते. मात्र कधी कधी जेवळ बनवता बनवता अचानक गॅस संपतो. त्यामुळे किचनमधील कामं थांबतात. थंडीच्या दिवसांमध्ये गरम पाण्याचा वापर वाढतो. तसेच पिण्यासाठीही पाणी गरम केलं जातं. 2 / 5त्यामुळे सिलेंडरमधील गॅस किती उरलाय, हे सहजासहजी कळत नाही. अनेकजण सिलेंडर हलवून आत किती गॅस आहे, या अंदाज घेतात. तर काही जण शेगडीवरील ज्योतीच्या रंगावरून गॅसचा अंदाज घेतात. 3 / 5मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा ट्रिकविषयी सांगणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे, हे तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला केवळ एका ओल्या कपड्याची गरज लागेल. त्यासाठी ओल्या कपड्याने संपूर्ण सिलेंडर कव्हर करावा. तसेच काही काळ तसाच सोडला पाहिजे. 4 / 5काही मिनिटांनंतर ओल्या कपड्याला सिलेंडरवरून हटवावे. तुम्ही पाहाल की सिलेंडर हा काही ठिकाणी ओला, तर काही ठिकाणी पूर्णपणे सुकलेला दिसेल. जिथे कपडा सुकलेला नसेल, तिथे एलपीजी असतो. त्यामुळे तेथील पाणी सुकण्यास वेळ लागतो. 5 / 5जिथे सिलेंडरमध्ये रिकामी जागा असते. ती जागा इतर जागांच्या तुलनेत अधिक गरम असते. त्यामुळे तेथील पाणी लवकर सुकते. त्यामुळे या ट्रिकच्या माध्यमातून सिलेंडरमध्ये किती गॅस उरला आहे हे जाणून घेणे अधिक सोपे जाते. आणखी वाचा Subscribe to Notifications