शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

किती असते IPS अधिकाऱ्याची सॅलरी? बंगला, गाडी, ड्रायव्हर, नोकर-चाकरांसह मिळतात या खास सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 1:08 PM

1 / 10
UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. ही परीक्षा पास झाल्यानंतर, जेव्हा IPS ची नोकरी मिळते, तेव्हा त्या व्यक्तीला एक प्रतिष्ठाही प्राप्त होते. कुठल्याही जिल्ह्यात पोलीस दलातील सर्वोच्च अधिकारी अथवा एसपी एक आयपीएस अधिकारी असतो. पण याच आयपीएस अधिकाऱ्याला कोण कोणत्या सुविधा मिळतात आणि त्याच्या जबाबदाऱ्यांसंदर्भात जाणून घेऊयात.
2 / 10
आयपीएस अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या - आपल्या कार्यक्षेत्रातील कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे, ही इंडियन पोलीस सर्व्हिस (IPS) जॉइन करणाऱ्या अधिकाऱ्याची मुख्य जबाबदारी असते. आयपीएस अधिकाऱ्यांना नंतर, डेप्युटी एस.पी, एसपी, डीआयजी, आयजी, डीजीपी सारख्या पदांसाठी प्रमोशन मळते.
3 / 10
IPS अधिकाऱ्यांना मिळतात या सुविधा - एका आयपीएस अधिकाऱ्याला सॅलरी शिवाय इतरही अनेक सुविधा मिळतात. मात्र या सुविधा पे-बँडनुसार असतात. एका IPS अधिकाऱ्याला घर आणि वाहनाची सुविधा दिली जाते. मात्र, कार आणि घराची साइज पोस्टच्या आधारावर निश्चित होते.
4 / 10
याच बरोबर, आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांच्या पोस्टनुसार, ड्रायव्हर, हाऊस हेल्प आणि सुरक्षा रक्षकही दिले जातात. याशिवाय त्यांना त्यांच्या पदानुसार, मेडिकल ट्रीटमेंट, फोन आणि वीज बिलासाठी भत्ताही दिला जातो.
5 / 10
IPS अधिकाऱ्याची सॅलरी - एका आयपीएस अधिकाऱ्याच्या सॅलरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, 7व्या वेतन आयोगानुसार, एक आयपीएस अधिकाऱ्याला 56100 रुपये सॅलरी मिळते. बेसिक सॅलरी शिवाय IPS अधिकाऱ्याला महागाई भत्ता आणि इतरही अनेक प्रकारचे भत्ते मिळतात.
6 / 10
एक IPS अधिकारी प्रमोशननंतर, डीजीपी पदापर्यंत पोहोचू शकतो आणि डीजीपी पदावरील अधिकाऱ्याला सर्वाधिक सॅलरी मिळते. डीजीपी झाल्यानंतर एका आयपीएस अधिकाऱ्याला जवळपास 2.25 लाख रुपये महीना एवढी सॅलरी मिळते.
7 / 10
मिळतात एवढे सारे फायदे...! - एक एसपी अॅकॅडमिक लिव्ह घेऊन देश-विदेशातील नामांकित विद्यापीठांमधून शिक्षणही घेऊ शकतो. त्यांना 30 दिवसांच्या इएल आणि 16 दिवसांच्या सीएल देखील मिळतात. एवढेच नाही, तर मुलांच्या शिक्षणासाठीही अॅनुअल एज्युकेशन अलाउन्स देखील मिळतो.
8 / 10
महत्वाचे म्हणजे, आयपीएस अधिकाऱ्याला मिळणाऱ्या सुविधांमध्ये आणखी एक महत्वाची सुविधा म्हणजे, ते देशातील मोठ्या रुग्णालयांतून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबीयांचाही मोफत इलाज करून घेऊ शखतात. याशिवाय त्यांना वर्षातून एक वेळा ट्रॅव्हल कन्सेशनही मिळते. ते देशात कुठेही आपल्या कुटुंबीयांसह फिरायला जाऊ शकतात.
9 / 10
कसे बनू शकता IPS अधिकारी - एसपी होण्याच्या दोन पद्धती आहेत. एक म्हणजे, यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षा क्रॅक करून आणि दुसरी म्हणजे, राज्य पातळीवरील सिव्हिल सर्व्हिस पास होऊनही होता येते. पहिल्या पद्धतीने आयपीएस होण्यासाठी यूपीएससी परीक्षा चांगल्या रँकने क्लिअर व्हावे लागते.
10 / 10
दुसरा पद्धतीनुसार, स्टेट लेव्हल परीक्षा क्लियर करून डीएसपी झाल्यानंतर, एसपी पदापर्यंत पहोचता येऊ शकते. मात्र याला 15 ते 20 वर्षांचा वेळ लागू शकतो. मात्र या दोन्ही पद्धतींसाठी काही शारीरिक मापदंड आहेत. ते असणे आवश्यक आहे.
टॅग्स :PoliceपोलिसGovernmentसरकारEmployeeकर्मचारीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग