शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राम मंदिरासाठी सरकारी तिजोरीतून किती पैसा खर्च झाला?; योगींनी हिशोब सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 4:44 PM

1 / 10
उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभं राहतंय. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राम जन्मभूमी मंदिर ट्रस्ट बनवण्यात आले. त्यानंतर मंदिर बांधकामासाठी रामभक्तांकडून मोठ्या प्रमाणात दान आले. आता मंदिर बांधकामासाठी लागणारा खर्च किती झाला आणि सरकारी तिजोरीतून किती पैसे दिले यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिशोब सांगितला आहे.
2 / 10
योगी म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शन, विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व आणि साधू संताचे आशीर्वाद आहेत. राम मंदिराच्या आंदोलनामुळे आज भव्य राम मंदिर निर्माण झाले आहे. परंतु याठिकाणी केंद्र असो वा राज्य कुठल्याही सरकारने त्यांच्या सरकारी तिजोरीतून एक पैसादेखील दिला नाही हे त्यांनी स्पष्ट केले.
3 / 10
मंदिराच्या कुठल्याही बांधकामासाठी सरकारी पैशांचा वापर केला गेला नाही. हा सर्व पैसा देशातील राम भक्तांच्या देणगीतून जमा झालेला आहे. केवळ देशातूनच नव्हे तर परदेशातूनही रामभक्तांनी मोठ्या प्रमाणात मंदिर बांधकामासाठी देणगी दिली आहे. त्यातूनच आता निर्माण होत असलेल्या राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे असं योगींनी म्हटलं.
4 / 10
त्याचसोबत पै पैचा हिशोब ठेऊन राम जन्मभूमी न्यास या मंदिराचे बांधकाम पूर्ण करत आहे. पण हे नक्की आहे की, मंदिराच्या आसपास होणारा विकास मग अयोध्येत होणाऱ्या एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, रस्त्याचे चौपदरीकरण, पार्किंगची सुविधा या सर्व गोष्टी सरकारी पैशातून विकसित करण्यात येत आहे. हे काम सरकारी निधीतून सरकारी पॉलिसीनुसार करत आहे असं योगींनी सांगितले.
5 / 10
तर विरोधकांकडून सातत्याने आरोप केलाय जातोय की, राम मंदिर उद्घाटनाचे श्रेय आणि सोहळा भाजपा करत आहे त्यावर योगींनी पलटवार केला. आम्ही राम मंदिर सोहळ्याचे श्रेय घेत नाही. आम्ही सेवक म्हणून तिथे चाललोय. मंदिराचे आमंत्रण काँग्रेस, सपासह सगळ्यांना दिले. त्यांना राम मंदिरात येण्यापासून कुणी रोखले नाही असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
6 / 10
आम्ही रामभक्त आणि रामाचे सेवक म्हणून सोहळ्याला मंदिरात उपस्थित असू. राम मंदिराच्या प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला हजर राहता येणे हे आमचे सौभाग्य आहे. जे काम शेकडो पिढ्या पाहू शकल्या नाहीत. ज्याला ५०० वर्ष लागली. ते राम मंदिराच्या निर्माणाचे आणि रामलला विराजमान होण्याचे आम्ही साक्षीदार आहोत असं त्यांनी सांगितले.
7 / 10
दरम्यान, २०२५ पर्यंत राम मंदिराचे बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राम मंदिराच्या बांधकामासाठी ५५०० कोटी रुपये दान मिळाले आहे. ट्रस्टने ३ बँकेत खाते उघडले आहे. त्यात बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बॅकेचा सहभाग आहे.
8 / 10
मार्च २०२३ च्या अखेरपर्यंत मंदिर ट्रस्टच्या नावावर ३ हजार कोटी बँकेत जमा होते. तर ट्रस्टने मंदिर बांधकामासाठी १ हजार कोटीहून अधिक खर्च केलेत. बँक ऑफ बडोदा या बँकेत ट्रस्टची सर्वात मोठी रक्कम जमा आहे. अयोध्या जिल्ह्यात या बँकेच्या ३५ शाखा आहेत. ज्यातील एक मंदिराच्या जवळच आहे.
9 / 10
राम मंदिर ट्रस्टला अधिकृतपणे श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र म्हणून ओळखले जाते. फेब्रुवारी २०२० मध्ये अयोध्येबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर परदेशातून दान घेण्याची परवानगीही ट्रस्टला मिळाली आहे. ट्रस्टला देणगी देणे आणि पास जारी करण्याबाबतची वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात ऑनलाईन पेमेंटही घेतले जाते.
10 / 10
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रच्या वेबसाईटनुसार, एकट्या मोरारी बापू यांनी राम मंदिरासाठी ११.३ कोटी रुपये देणगी दिलीय. त्याशिवाय अमेरिका, कॅनडा, ब्रिटनमधील रामभक्तांनीही ८ कोटी रुपये देणगी म्हणून दिलेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी जवळपास १८०० रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या