तिरुपती मंदिराच्या पुजाऱ्यांना किती सॅलरी मिळते? जाणून थक्क व्हाल; अनेक हाय प्रोफाइल नोकऱ्यांपेक्षाही अधिक कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 17:10 IST
1 / 6आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला पर्वतावर असलेले तिरुपती बालाजी मंदिर हे भारताती सर्वा प्रसिद्ध आणि सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. हे तिरुपती बालाजींचे मंदिर केवळ श्रद्धेचेच केंद्र नाही, तर येथील पुजाऱ्यांना मिळणारी सॅलरीही देशभरात चर्चेचा विषय असतो. 2 / 6सॅलरी जाणून थक्क व्हाल! - तिरुपती मंदिराचे व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) द्वारे केले जाते. रिपोर्ट्सनुसार, येथील मुख्य पुजाऱ्याला दरमहा सुमारे ८२००० रुपये एवढी सॅलरी मिळते. तर ज्येष्ठ पुजाऱ्यांना ५२००० रुपयांपर्यंत पगार दिला जातो. याशिवाय, कनिष्ठ पुजाऱ्याला ३०००० ते ६०००० रुपयांपर्यंत सॅलरी दिली जाते.3 / 6माध्यमांतील वृत्तांनुसार, २०१० मध्येच TTD बोर्डाने पुजाऱ्यांच्या सॅलरीमध्ये मोठी वाढ केली होती. तेव्हा मुख्य पुजाऱ्याची सॅलरी ५५००० रुपये तर कनिष्ठ पुजाऱ्याची सॅलरी ३०००० रुपये महिना करण्यात आली होती. 4 / 6तिरुपती बालाजी मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, येथे स्थापित भगवान वेंकटेश्वरांची मूर्ती, मानवनिर्मित नाही. तर ती स्वतःच प्रकट झाली आहे, अशी मान्यता आहे. यामूर्तीवर अजूनही जखमांच्या खुणा आहेत, ज्यांवर रोज चंदनाचा लेप औषध म्हणून लावला जातो.5 / 6या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, मंदिराच्या गर्भगृहात उभे राहून लक्ष देऊन ऐकल्यास, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. भगवान व्यंकटेश्वर यांच्या छातीवर देवी लक्ष्मी आणि पद्मावती विराजमान आहे.6 / 6तिरुपती बालाजी मंदिर...