How to open a shop at a railway station? No matter the season, the income is all time high
Railway Station Stall: रेल्वे स्टेशनवर दुकान कसे सुरु करावे? सिझन कोणताही असो, छप्परफाड कमाई By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 9:58 AM1 / 6रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहिले असेल दुकाने असतात. या दुकानांना गिऱ्हाईकच गिऱ्हाईक असते. दररोज प्रवास करणारे हजारो प्रवासी काही ना काही घेत असतात. या दुकानदारांची कमाई किती असेल? हजारांत नाही लाखांत असते. रेल्वे त्यासाठी काही हजारांत भाडे आकारते. सिझन कोणताही असो, हे दुकानदार तगडी कमाई करतात. ती देखील कमी गुंतवणुकीत. 2 / 6मग तुम्ही काय विचार करताय? रेल्वे स्थानकावर दुकान कसे सुरु कराल? आधीपासूनच लोकांनी मिळविली आहेत, मग आपल्याला कसे मिळेल, असेच ना. तर तसे नाहीय. ते काही कामयस्वरुपी मालकीचे दुकान नसते. तर रेल्वे त्यासाठी टेंडर काढत असते. भारतीय रेल्वे किंवा IRCTC च्या वेबसाइटद्वारे तुम्ही दुकान घेण्यास इच्छुक असलेल्या रेल्वे स्टेशनवर दुकान उपलब्ध आहे की नाही, हे तुम्हाला समजते. 3 / 6आपण स्टेशनवर कोणत्या प्रकारचे दुकान आणि कोणता व्यवसाय करू शकता याची माहिती घेऊया. दुकानाच्या आकारमानानुसार आणि स्थानानुसार रेल्वे तुमच्याकडून शुल्क आकारते. त्यानंतर तुम्ही कोणता व्यवसाय करायचा असेल, त्यानुसार तुम्ही गुंतवणूक करू शकता. पुस्तकांचे स्टॉल, चहा-कॉफीचे स्टॉल, खाद्यपदार्थांचे स्टॉल, न्यूजपेपर स्टॉल्स सुरु करू शकता. याचा खर्च सुमारे 40 हजार ते 3 लाखांपर्यंत येईल. 4 / 6प्रवाशांची सोय व्हावी आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने ही योजना सुरू केली आहे. अनेकदा तुम्हाला त्या त्या ठिकाणचे पदार्थ किंवा वस्तू विकणारी दुकानेही दिसतात. जसे की कोकणात कोकम, सरबते, काजू, खाजा आदी पदार्थांची दुकाने दिसतात. आलेले प्रवासी या वस्तू घेऊन जाऊ शकतात. यामुळे प्रोत्साहन मिळते. मुंबईत खाद्यपदार्थ आदी मिळतात. 5 / 6जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दुकान उघडायचे असेल तर तुम्ही भारताचे नागरिक असणे बंधनकारक आहे. तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र आदी कागदपत्रे असणे अनिवार्य आहे. तुम्हाला ज्या स्थानकावर दुकान म्हणजेच स्टॉल सुरु करायचा आहे तिथे निविदा जारी करण्यात आली आहे की नाही, हे आयआरसीटीसी किंवा रेल्वेच्या वेबसाइटवर पहावे लागेल. 6 / 6टेंडर प्रक्रियेत अर्ज भरल्यानंतर रेल्वेच्या झोनल ऑफिस किंवा डीआरएम ऑफिसमध्ये तो नेऊन द्यावा. किंवा ऑनलाईन देखील भरण्याची सोय आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर, रेल्वे तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी करेल आणि त्यानंतर तुम्ही निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकता. यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट www.indianrailways.gov वर जावे लागेल. आणखी वाचा Subscribe to Notifications