शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Discount on Liquor Delhi: सेल सेल सेल! असे काय झाले की, दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर रांगा लागल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 4:04 PM

1 / 7
दिल्लीत सध्या नोटाबंदीसारखी स्थिती सुरु आहे. परंतू ही रांग एटीएम, बँकांसमोर नाही तर दारुच्या दुकानांवर लागली आहे. यामुळे एरव्ही आडवारांना असणाऱ्या गर्दीपेक्षाही कधी नव्हे अशी गर्दी उसळली आहे.
2 / 7
दिल्ली सरकारने नवीन एक्साईज पॉलिसी आणलीआहे. यामुळे देशी, वेदेशी दारुचे दर कमालीचे कमी झाले आहेत. याचबरोबर दुकानदारांना डिस्काऊंट देण्याची परवानगीदेखील देण्यात आली आहे. याचा उलटाच परिणाम दिसू लागला आहे. ज्या ज्या रस्त्यांवर ही वाईन शॉप, दारुची दुकाने आहेत तिथे तिथे प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळाली आहे.
3 / 7
या रस्त्यांवर आता वर्दळ वाढली आहे. वाहतूक जास्त असतानाच्या वेळेतही आता दारु खरेदी करणाऱ्यांची वाहने येऊ लागल्याने तासंतास लोकांना कोंडीतच काढावे लागत आहेत.
4 / 7
त्यातच या रस्त्यांवर आधीचेच अतिक्रमण आणि पार्किंग असल्याने सायंकाळी पाच वाजता कार्यालयातून बाहेर पडलेले लोक रात्री ८-९ वाजताच घरी पोहोचू लागले आहेत. काही मिनिटांचा रस्ता आता काही तासांचा झाला आहे.
5 / 7
एका दिल्लीकराने सांगितले की, रस्त्यांवर आधीच वाहतूक कोंडी असायची. परंतू जेव्हापासून नवे दारुचे दुकान उघडले आहे तेव्हापासून समस्या आणखीनच वाढली आहे. दारुचे दुकान सुरु झालेय त्याच्या १०० मीटरमध्येच शाळा आहे. तरीदेखील तिथे दारुचे दुकान सुरु करण्यात आले आहे.
6 / 7
या रस्त्यांवर जे रिक्षावाले जात-येत होते त्यांनी भाडेवाढ केली आहे. ईरिक्षा वाल्यांनी १० ते १५ रुपये वाढविले आहेत. यामुळे मद्यप्रेमींना जरी दारु स्वस्त मिळू लागली असली तरी सामान्य प्रवाशांना भूर्दंड सोसावा लागत आहे.
7 / 7
दिल्लीत मद्याच्या बाटल्यांचे दर एवढे कमी झालेत की, ३००० रुपयांची बॉटल १८०० रुपयांना, 7,415 रुपयांची 5,115 रुपयांना, एवढेच नाही एकावर एक फ्रीच्या देखील ऑफर सुरु झाल्या आहेत.
टॅग्स :delhiदिल्लीTrafficवाहतूक कोंडी