शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मी भाग्यवान... राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण; मोदींनी जागवली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 10:15 AM

1 / 11
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाली असून २२ जानेवारी २०२४ रोजी तो क्षण देशभरात साजरा होणार आहे.
2 / 11
भारतीय जनता पक्षासह हिंदुत्त्ववादी संघटना आणि काही राजकीय पक्षांनी अयोध्येत मंदिरासाठी लढा दिला. त्यात, विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे.
3 / 11
सन १९८७ साली मोदी नरेंद्र मोदी हे लालकृष्ण अडवाणींसोबत रथयात्रेत सहभागी होते. आता, २०२४ मध्ये ते अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीराम यांची प्राण प्रतिष्ठा करणार आहेत.
4 / 11
आता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते येथील श्री रामलल्ला सरकारची प्राण-प्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी, श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टकडून मोदींना २२ जानेवारीसाठी अधिकृत निमंत्रणही देण्यात आलं आहे.
5 / 11
या सोहळ्यासाठी सरसंघाचालक मोहन भागवत आणि युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत. यांसह देशभरातून २५०० दिग्गज व्यक्तींची उपस्थिती असणार आहे.
6 / 11
२२ जानेवारी २०२४ रोजी राम जन्मभूमी मंदिरात हा सोहळा होईल. त्यासाठी, देशभरातून ४००० संत महात्मा अयोध्येत येतील, अशी माहिती श्री राम जन्मभूमी तिर्थक्षेत्राच्यावतीने देण्यात आली आहे.
7 / 11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन जय सियाराम म्हणत या निमंत्रणाच्या क्षणावर आपली प्रतिक्रिया दिली. आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे, मी स्वत:ला खूप धन्य मानतो, असे मोदींनी फोटो शेअर करत म्हटले
8 / 11
मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की, माझ्या जीवनात मी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होत आहे. मी आज धन्य झालो, असेही मोदींनी म्हटले.
9 / 11
जगभरातील भारतीयांचे लक्ष या सोहळ्याकडे लागले असल्याने भव्य आणि दिव्य सोहळ्याची तयारी सुरू आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणातून अयोध्येतील राम मंदिराचा उल्लेख केला होता.
10 / 11
आगामी लोकसभा निवडणुका आणि प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा जवळ येत आहे. अवघ्या तीन महिन्यांवर हा राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा येऊन ठेपला आहे.
11 / 11
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची जुने फोटो शेअर करत समर्थकांनी या मंदिरासाठी मोदींनी दिलेल्या योगदानाची आठवण करुन दिली जात आहे.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपा