शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मी चंद्रावर पोहचलो! भारतानं ‘असा’ घडवला इतिहास; कसा होता Chandrayaan-3 प्रवास?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 7:01 PM

1 / 11
२३ ऑगस्ट हा दिवस भारतासाठी अंतराळ क्षेत्रात ऐतिहासिक ठरला आहे. चंद्रयान-३ मोहीम फत्ते झाली असून भारताने इतिहास घडवला आहे. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताच्या विक्रम लँडरने यशस्वीपणे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले.
2 / 11
इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी मोहिमेसाठी अनेक वर्षे कठोर परिश्रम घेतले आहेत. या यशस्वी मोहिमेनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. चंद्रयान-३ मिशनमध्ये काय घडले हे तुम्हाला माहिती आहे का? प्रक्षेपण कधी झाले? त्यानंतर कोणत्या प्रक्रिया झाल्या? तर जाणून घ्या हा संपूर्ण प्रवास
3 / 11
६ जुलै - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने बहुप्रतिक्षित चंद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितले की, चंद्रयान-३ मिशन १४ जुलै रोजी दुपारी २:३५ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील दुसऱ्या प्रक्षेपण पॅडवरून उड्डाण करेल.
4 / 11
११ जुलै: इस्रोने चंद्रयान-३ चा चंद्रावर उतरण्याचा यशस्वी अभ्यास केला. इस्रोच्या एका ट्विटमध्ये असे सांगण्यात आले की, प्रक्षेपणाची संपूर्ण तयारी आणि प्रक्रियेची २४ तासांची तालीम डमी स्वरूपात यशस्वीपणे पूर्ण झाली.
5 / 11
१४ जुलै: भारताची तिसरी चंद्र मोहीम 'चंद्रयान-३' प्रक्षेपित करण्यात आली. चंद्रयान-३ ने दुपारी २.३५ वाजता चंद्राच्या दिशेने उड्डाण केले. मिशन पाठवण्यासाठी LVM-3 लाँचरचा वापर करण्यात आला.
6 / 11
१५ जुलै: चंद्रयान-३ ने पहिली कक्षा पूर्ण केली. म्हणजे त्यानं पहिला टप्पा पूर्ण केला. अंतराळयान 41762 किमी x 173 किमीच्या कक्षेत पोहोचले. त्यानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की २३ ऑगस्ट रोजी ४१ दिवसांनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंगच्या तयारीसाठी चंद्रयान-३ चे पृथ्वीपासूनचे अंतर वाढवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
7 / 11
१७ जुलै : भारताची अंतराळ मोहीम चंद्रयान-३ ने पृथ्वीच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला. १८ जुलैला चंद्रयान-३ ने पृथ्वीच्या तिसऱ्या कक्षेत प्रवेश केला. २० जुलैला चंद्रयान ३ ने त्याचा चौथा टप्पा यशस्वीपणे पार केला.
8 / 11
१ ऑगस्ट: चंद्रयान-३ पृथ्वीच्या कक्षेतून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले आणि चंद्राच्या कक्षेकडे पाठवण्यात आले. ‘चंद्रयान-३’ ने पृथ्वीची कक्षा पूर्ण केली असून ते चंद्राच्या दिशेने जात असल्याचे इस्रोने म्हटलं. चंद्रयान-३ ने चंद्राभोवती २८८ किमी x ३६९३२८ किमी कक्षेत प्रवेश केला.
9 / 11
९ ऑगस्ट: हळूहळू त्याचा वेग कमी करत चंद्राच्या पुढील कक्षेत पोहोचण्याची प्रक्रिया चालू राहिली. दुपारी दोनच्या सुमारास तिसर्‍या टप्प्यात प्रवेश घेतला. १४ ऑगस्टला चंद्रयान-३ चौथ्या कक्षेत नेण्याची प्रक्रिया पार पडली. या दिवशी मोहीम १५१ x १७९ किमीच्या कक्षेच्या गोलाकार टप्प्यावर पोहोचली.
10 / 11
१७ ऑगस्ट: लँडिंग मॉड्यूल त्याच्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे केले गेले. लँडिंग मॉड्यूलमध्ये प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर यांचा समावेश आहे. १८ ऑगस्टला 'डीबूस्टिंग' प्रक्रिया पार पाडली ज्यामुळे त्याची कक्षा 113 किमी x 157 किमी इतकी कमी झाली. खरं तर, डीबूस्टिंग ही गती कमी करण्याची पद्धत आहे. २० ऑगस्टला चंद्रयान-३ ने त्याचे अखेरचे डिबूस्ट ऑपरेशन पूर्ण केले, विक्रम लँडरची कक्षा 25 किमी x 134 किमीपर्यंत खाली आणली.
11 / 11
२३ ऑगस्ट : प्रक्षेपणानंतर २२ दिवसांनी चंद्रयान-३ मोहीम यशस्वी झाली, चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरने सॉफ्ट लँडिंग केले. भारताच्या या यशाचं संपूर्ण जगात कौतुक होऊ लागले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत पहिला देश ठरला आहे.
टॅग्स :Chandrayaan-3चंद्रयान-3isroइस्रो