By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 14:44 IST
1 / 6भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला आहे. कर्नाटकातील उटीजवळ (Ooty) हेलिकॉप्टर क्रॅश झालं. महत्त्वाचं म्हणजे या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांचा समावेश होता.2 / 6मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे हा अपघात घडला. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत यांच्या पत्नीही होत्या. 3 / 6सदर घटनेत ४ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली आहे.4 / 6सीडीएस बिपीन रावत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती, माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिली आहे. घटनेत ३ गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.5 / 6तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हवाई दलाचे हे Mi-17V5 हेलिकॉप्टर होते. 6 / 6सीडीएस जनरल बिपीन रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती हवाई दलाने दिली आहे.