जाणून घ्या दहशतवाद्यांचा कर्दनकाळ ठरलेल्या मिराज 2000 विमानांची खासियत By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 9:40 PM
1 / 5 भारतीय हवाई दलात 'मिराज' लढाऊ विमान आहेत. 1970 साली या विमानांचे डिझाईन तयार करण्यात आले होते. Dassault Aviation या कंपनीने या विमानांची निर्मिती केली आहे. 2 / 5 हवाई हल्ल्यासाठी या विमानांचा वापर करण्यात येतो. कालांतराने कंपनीने मिराजमध्ये काही बदल करुन त्याला अधिक सक्षम असे मल्टिरोल लढाऊ विमान बनविले. 3 / 5 ‘मिराज 2000’ लढाऊ विमान औपचारिकपणे 29 जून 1985 मध्ये भारतीय वायुसेनाच्या 7 क्रमांकाच्या स्क्वाड्रॉनमध्ये समाविष्ट करण्यात आले. कारगिल युद्धात मिराज लढाऊ विमानांचा मोठ्याप्रणात वापर करण्यात आला होता. 4 / 5 ‘मिराज 2000’ विमानाची लाबी 47 फूट आहे. वजन जवळपास 7500 किलो इतके आहे. 2336 किमी प्रतितास स्पीड आहे. तर 125 राउंड गोळ्या प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे. 5 / 5 तसेच, 68 मिमीची 18 रॉकेट प्रती मिनिट फायरिंगची क्षमता आहे. जमिनीच्या जवळ जाऊन देखील हल्ला आणि अचूक लक्ष अचूक साधण्याची क्षमता या विमानामध्ये आहे. आणखी वाचा