शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शाब्बास पोरा! रिक्षा चालकाच्या लेकाने करून दाखवलं, झाला IAS अधिकारी, फीसाठी नव्हते पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 4:23 PM

1 / 7
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक कौतुकास्पद घटना आता समोर आली आहे. आयएएस अधिकारी अन्सार शेख यांची गोष्ट प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे. ते भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. IAS अन्सार अहमद शेख यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC 2016 उत्तीर्ण केली
2 / 7
देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी अन्सार हे युनूस शेख अहमद यांचा मुलगा आहेत. अन्सार यांचे वडील महाराष्ट्रातील मराठवाड्यात ऑटोरिक्षा चालक म्हणून काम करत होते. अन्सार शेख घरगुती हिंसाचार आणि बालविवाह जवळून पाहत मोठे झाले. त्याच्या बहिणींचे वयाच्या 15 व्या वर्षी लग्न झाले होते.
3 / 7
अन्सार यांचा धाकटा भाऊ अनीसने सातवीत असतानाच शाळा सोडली आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि अन्सारला IAS परीक्षेची तयारी करण्यास मदत करण्यासाठी गॅरेजमध्ये काम केले. अन्सार शेख यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी इतिहास रचला होता.
4 / 7
अन्सार शेख यांचे बालपण हे एखाद्या युद्धापेक्षा कमी नव्हते. सर्व अडथळे पार केले, समस्यांचा सामना केला. अन्सार यांनी कधीच आपले ध्येय सोडले नाही. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास तयार नसलेल्या अन्सार यांनी एक नवीन मार्ग स्वीकारला ज्यामुळे इतिहास रचला.
5 / 7
आवश्यक ज्ञान आणि अभ्यासाने स्वत:ला सज्ज केल्यानंतर, अन्सार यांनी नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज केला आणि तेथे 275 पैकी 199 गुण मिळाले. विशेषत: त्यांच्या कुटुंबात शिक्षणाला प्राधान्य नव्हते हे लक्षात घेता त्यांचे यश कौतुकास्पद आहे.
6 / 7
अन्सार अहमद शेख यांनी आपल्या यशाबद्दल सांगताना 'कष्टाला पर्याय नाही. माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या मित्रांनी मला मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खूप मदत केली आणि माझ्या कोचिंग अकादमीनेही मला माझ्या वाईट काळात मदत केली. आर्थिक परिस्थितीमुळे, फी चा एक भाग माफ केला' असं म्हटलं आहे.
7 / 7
एका रिपोर्टनुसार, अन्सार शेख यांनी एकदा आयएएस इच्छुकांना आपल्या मेसेजमध्ये म्हटले होते की, 'तुमची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांशी आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. तुमची स्पर्धा फक्त तुमच्याशीच आहे. निराशावादी विचारांपासून मुक्त व्हा, यश तुमच्या पायाला स्पर्श करेल.' एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. (सर्व फोटो - झी न्यूज)