शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लग्नाआधीच IAS टीना डाबी आणि IAS प्रदीप गावंडेंनी घेतला मोठा निर्णय; फॅन्सना बसला जबर धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 3:17 PM

1 / 8
UPSC टॉवर IAS टीना डाबी आणि त्यांचा भावी पती IAS डॉ. प्रदीप गावंडे यांच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. पण, लग्नाआधी या दोघांनी मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या टीना आणि त्यांच्या पतीने सोशल मीडियापासून लांब होण्याचा निर्णय घेतला आहे.
2 / 8
टीना डाबीने तिचे इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट डिअॅक्टिव्हेट केले आहे, तर प्रदीप गावंडे यांनीही इन्स्टाग्रामवरील आपले अकाउंट बंद केले आहे. मात्र, टिना अजूनही ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेत.
3 / 8
टीना डाबीचे इंस्टाग्रामवर 1.5 मिलियन फॉलोअर्स होते, तर फेसबुकवरही लाखो लोक फॉलो करायचे. प्रदीप गावंडेंनाही इंस्टाग्रामवर 40 हजारांहून अधिक फॉलोअर्स होते, पण आता दोघांनी सोशल मीडियाचा निरोप घेतला आहे.
4 / 8
त्यांनी सोशल मीडियापासून लांब होण्याचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र, आयएएस दाम्पत्याच्या या कृतीने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
5 / 8
गेल्या काही दिवसांपासून टीना आणि प्रदीप त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असतात. स्वत: टीना डाबीने फोटो शेअर करुन आयएएस प्रदीप गावंडे यांच्यासोबत लग्न करत असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती.
6 / 8
टीनाने प्रदीपसोबतच्या तिच्या प्रेमाबद्दल एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांची भेट कोरोनाच्या काळात झाली आणि त्यानंतर दोघांची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यावेळी दोघेही राजस्थानच्या आरोग्य विभागात एकत्र काम करत होते. टीना आणि प्रदीप दोघेही राजस्थान कॅडरचे आयएएस आहेत.
7 / 8
आयएएस टीना डाबी यांचे हे दुसरे लग्न आहे, तर प्रदीप गावंडे यांचे पहिले लग्न आहे. प्रदीप टीना डाबीपेक्षा 13 वर्षांनी मोठे आहेत. टीना डाबीचे पहिले लग्न अतहर आमिर खानसोबत झाले होते. अतहर हेदेखील आयएएस अधिकारी आहेत. लग्नाच्या 2 वर्षानंतरच दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.
8 / 8
त्यानंतर आता टीना प्रदीपसोबत लग्न करणार आहे. टीना आणि प्रदीपचे लग्न 20 एप्रिलला होणार असून लग्नाचे रिसेप्शन 22 एप्रिलला होणार आहे. मात्र, त्याआधीच त्यांनी आपापले सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामFacebookफेसबुकupscकेंद्रीय लोकसेवा आयोग