शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अतहर यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर IAS टीना डाबी यांची पहिली पोस्ट; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 2:09 PM

1 / 10
2015च्या IAS टॉपर टीना डाबी आणि त्यांचे पती IAS अतहर खान यांचा घटस्फोट झाला आहे. जयपूर फॅमिली कोर्टाने 10 ऑगस्ट रोजी त्यांना विभक्त होण्याची परवानगी दिली. या दोघांनीही 2018 मध्ये मोठ्या धूमधडाक्यात लग्न केले होते. मात्र, दोन वर्षांतच या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (IAS Tina Dabi's first post after her divorce from AtharAamir Khan, know about their love story)
2 / 10
टीना आणि अतहर यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये परस्पर सहमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. अतहर खान मूळचे काश्मीरचे आहेत. त्यांनी 2015 मध्ये यूपीएससी नागरी सेवा परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवला होता. तर टीना डाबी या मूळच्या दिल्ली येथील असून त्यांनी 2015 मध्येच यूपीएससी परीक्षेत टॉप केले होते. सध्या दोघेही राजस्थान केडरचे अधिकारी आहेत.
3 / 10
घटस्फोटानंतर टीना यांनी सोशल मीडियावर पहिली पोस्ट टाकली आहे. यात त्यांनी लिहिले आहे, की 'तुम्ही काहीही करा, लोक तुमच्याबद्दल बोलतीलच. तुम्ही असे करा ज्यापासून तुम्हाला आनंद मिळेल आणि तुम्ही तुमचे जीवन चांगल्या प्रकारे जगू शकाल, हेच चांगले होईल.' खरे तर, टीना आणि अतहर यांच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर अनेक लोक त्यांना ट्रोल करत आहेत. कदाचीत यासंदर्भातच टिना यांची ही पोस्ट असावी.
4 / 10
टीना आणि अतहर यांची लव्ह स्टोरी फिल्मी आहे. आयएएस प्रशिक्षणादरम्यान हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले. यूपीएससीच्या शर्यतीत अतहर जरी टीना यांच्यापेक्षा मागे राहिले, तरी त्यांनी त्यांच्या हृदयात स्थान मिळवले होते.
5 / 10
या दोघांची पहिली भेट 2016 ला नॉर्थ ब्लॉकमधील डीओपीटी कार्यालयात एका समारंभात झाली होती. यानंतर अतहर सायंकाळी त्यांना पुन्हा भेटण्यासाठी आले होते. यानंतर दोघांच्या भेटी वाढत गेल्या. तेव्हा एका मुलाखतीमध्ये टीना म्हणाल्या होत्या, की त्या अतहरची बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होत्या.
6 / 10
टीना यांनी एक दिवस अतहरसोबत एंगेजमेन्टची घोषणा करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. तेव्हा टिना म्हणाल्या होत्या, की मी पहिल्या नेजरेतच त्याच्या प्रेमात पडले होते.'
7 / 10
टीना म्हणाल्या होती, की 'त्यांच्या धैर्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. ते एक अद्भुत व्यक्ती आहेत. आम्ही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहोत. मात्र, दोन वर्षांतच त्यांच्या नात्यात चढ -उतार यायला सुरुवात झाली होती.
8 / 10
टीना यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून त्यांच्या नावासमोरील 'खान' आडनाव काढले. तेव्हाच, या दोघांच्या नात्यातील तणावाची बातमी आली होती. तेव्हाच, अथार यांनीही टीनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले.
9 / 10
टीना आणि अतहर सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय आहेत आणि आपल्या कामासंदर्भातील फोटो शेअर करत असतात. एकवेळ अशीही होती, जेव्हा दोघांच्याही अकाउंटवर एकमेकांचे फोटो दिसत होते.
10 / 10
दोघांनीही अनेकवेळा आपले फोटो सोशल मिडियावर टाकत होते. टीनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अतहरसोबतचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. मात्र, अतहरच्या इन्स्टाग्रामवर अजूनही दोघांची अनेक फोटो आहेत.
टॅग्स :Divorceघटस्फोटcollectorजिल्हाधिकारीJammu Kashmirजम्मू-काश्मीरdelhiदिल्लीRajasthanराजस्थान