शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Vaccination: कोविशील्ड, कोवॅक्सिनचे मिक्स डोस घेतल्यास काय होणार? समोर आली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 12:28 PM

1 / 8
देशात आलेली कोरोनाची दुसरा लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे.
2 / 8
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. सध्या देशात सर्वाधिक वापरात असलेल्या लसींचं मिक्सिंग करण्याचा विचार सुरू आहे.
3 / 8
सीरम निर्मित कोविशील्ड आणि भारत बायोटेक निर्मिती कोवॅक्सिन या २ लसींचा देशात सर्वाधिक वापर सुरू आहे. त्यामुळेच या लसींचं मिक्सिंग केल्यास काय होईल याबद्दल संशोधन करण्यात आलं. या संशोधनातील निष्कर्षांची माहिती अखिल भारतीय वैद्यकीय परिषदेनं (आयसीएमआर) दिली.
4 / 8
पहिला डोस कोवॅक्सिनचा आणि दुसरा डोस कोविशील्डचा घेतल्यास ते सुरक्षित असेल का, यावर आयसीएमआरनं संशोधन केलं. त्यातून समोर आलेली माहिती अतिशय दिलासादायक आहे.
5 / 8
'एडिनोव्हायरस प्लॅटफॉर्मवर आधारित असलेल्या एका लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पूर्णपणे निष्क्रिय व्हायरस असलेल्या लसीचा दुसरा डोस घेतल्यास चांगले परिणाम दिसतात. अशा प्रकारचं मिक्सिंग केवळ सुरक्षितच नाही, तर यामुळे रोगप्रतिकारशक्तीत मोठी वाढ होते,' असं आयसीएमआरनं सांगितलं.
6 / 8
कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींचा मिक्स डोस घेतल्यास कोरोना संक्रमणपासून अधिक चांगली सुरक्षा मिळू शकते ही बाब आयसीएमआरच्या संशोधनातून समोर आली आहे.
7 / 8
देशात आतापर्यंत ५० कोटी लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेत सर्वाधिक वापर कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा होत आहे.
8 / 8
जगभरात अनेक देशांमध्ये मिक्सिंग लसींबद्दल संशोधन सुरू आहे. बहुतांश ठिकाणी मिक्सिंग लसीकरणाचे उत्तम परिणाम दिसून आले आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस