पती- पत्नीने खातं उघडल्यास दर महिन्याला मिळेल दुप्पट फायदा; पाहा पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2021 12:24 PM
1 / 6 गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात छोट्यांपासून मोठ्यांपर्यत सर्वच उद्योगधंदे बंद पडली आहे. त्यामुळे अनेकांना पैसांची अडचण भासत आहे. सध्याच्या काळात नोकरीच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांवर फक्त घर चालू शकत नाही. त्यामुळे लोक पैसे मिळवण्यासाठी किंवा सध्या उपलब्ध असलेल्या पैशांची गुंतवणुक कशी करता येईल, याचा विचार करत असतात. 2 / 6 भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये देखील एक चांगली योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो. तसेच पती- पत्नीने संयुक्त खाते (Joint Account)उघडल्यास या योजनेचा जास्त लाभ तुम्हाला मिळू शकतो. 3 / 6 पोस्ट ऑफिसच्या या योजनेचे नाव 'मासिक उत्पन्न योजना' असं आहे. या योजनेमार्फत दर महिन्याला कमाई करण्याची संधी प्राप्त होईल. मासिक उत्पन्न योजनेत वैयक्तिक किंवा संयुक्त अशा दोन्ही पद्धतीने पोस्टात खाती उघडता येतात. या योजनेत वैयक्तिक खाते उघडायचे असल्यास तुम्ही किमान १००० रुपये ते जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये गुंतवू शकतात. तर संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये जमा करु शकतात. 4 / 6 याशिवाय सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर ठरेल. या योजनेमुळे तुम्हाला ६.६ टक्के वार्षिक व्याज मिळेल. या योजनेअंतर्गत तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानूसार परताव्याची मोजणी केली जाईल. 5 / 6 जर तुम्ही या योजनेत संयुक्त खातं उघडलं तर तुम्हाला या योजनेचा दुप्पट लाभ घेता येईल, म्हणजेच एखाद्या पती- पत्नीने या योजनेत संयुक्त खातं उघडून त्यामध्ये ९ लाख रुपयांची गुंतवणूक केली. ६.६ टक्के व्याजदराने ९ लाखाच्या जमा रकमेवर ५९४०० रुपयांचा रिटर्न त्यांना मिळू शकतो. याचाच अर्थ त्यांना दरमहा ४९५० रुपये मिळतील. शिवाय या योजनेत तुमची मूळ रक्कम सुद्ध सुरक्षित राहील. तुम्हाला हवे असल्यास ५ वर्षांनंतर आणखी ५ वर्षांचा गुंतवणुकीचा कालावधी वाढवू शकता. 6 / 6 मासिक उत्पन्न योजना योजनेतील चांगली गोष्ट म्हणजे या योजनेत दोन किंवा तीन लोक अकत्रपणे संयुक्त अकाउंट उघडू शकतात. त्यांच्या या संयुक्त अकाऊंटच्या बदल्यात च्या अकाऊंटमधील प्रत्येत सदस्यास समान उत्तपन्न दिले जाते. शिवाय तुम्हालानंतर कधी ते संयुक्त अकाउंट नको असल्यास त्या संयुक्त अकाउंटचे वैयक्तिक खात्यात रुपांतर केले जाऊ शकते. तसेच वैयक्तिक खातेसुद्धा संयुक्त खात्यात रुपांतरीत केले जाऊ शकते. खात्यात बदल करायचा असल्यास सर्व सदस्यांच्या संयुक्त अर्ज द्याला लागतो. आणखी वाचा