If schools in the country are not started; Raghuram Rajan's implicit warning
देशातील शाळा सुरू केल्या नाहीत तर; रघुराम राजन यांचा गंभीर इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 4:52 PM1 / 12कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत.2 / 12बोर्डाकडून शासनाच्या समितीने ठरवलेल्या नियमावलीनुसार मार्क देऊन विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. 3 / 12महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्टपासून राज्यातील 8 ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे, अजूनही स्टडी फ्रॉम होमच सुरू आहे. 4 / 12राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही निश्चितता नाही. त्यामुळे, मुलांच्या सर्वांगिण विकासाचा प्रश्न उद्भवत आहे. 5 / 12विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी शाळा बंद असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शाळांच्या मुद्यावरून गंभीर इशाराच त्यांनी दिला आहे. 6 / 12शाळा पुन्हा सुरू करण्यास आणि मुलांच्या शिक्षणात गती आणण्यात आणखी बिलंब हा आगामी दशकांपर्यत देशासाठी त्रासदायक ठरू शकतो, असे राजन यांनी म्हटले आहे. 7 / 12राजन यांनी क्विंट ग्रुपचे सह-संस्थापक राघव बहल यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल मोठं विधान केलं आहे. 8 / 12“मुलांना दीड वर्षांपासून काय शिकायला मिळालं आहे, याची कल्पना करा. समस्या फक्त एवढीच नाही की ते पुढे जात नाहीत, पण ते विसरतही आहेत. 9 / 12जर तुम्ही दीड वर्षापासून शाळेबाहेर असाल, तर तुम्ही परत गेल्यावर कदाचित तीन वर्ष मागे असाल.”, असे राजन यांनी या मुलाखतीत म्हटले आहे. 10 / 12“मला खरोखरच आशा आहे की राज्य आणि केंद्र सरकार या मुलांना शाळेत परत कसे आणता येईल, विशेषत: गरीब घटकांबद्दल खूप विचार करत आहे. अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे.”, असे राजन यांनी म्हटलं.11 / 12मार्च २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून भारतातील शाळा बंद आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या वर्षीही शाळा सुरू करण्याबाबतचा विचारही दुसऱ्या लाटेमुळे फोल ठरला. 12 / 12यूनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे. तर, डिजिटल शिक्षणप्रणाली परिणामकारक नसल्याचं सिद्ध झालंय. आणखी वाचा Subscribe to Notifications