शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘डॉक्टरांना देता, तर इकडेही द्यावं लागेल..,’ म्हणत करौली बाबांनी एक लाख रुपये वाढवले होमाचे शुल्क

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 8:27 AM

1 / 9
नोएडाचे डॉक्टर सिद्धार्थ चौधरी यांना मारहाण केल्याच्या आरोपानंतर चर्चेत आलेले कानपूरचे करौली बाबा संतोष सिंह भदौरिया हे नेहमीच चर्चेत असतात. ते रोज नवनवे दावे करत आहेत.
2 / 9
आता अशी बातमी आहे की करौली बाबांनी त्यांच्या एकदिवसीय होमाचे शुल्क जवळपास दुप्पट केले आहे. आता लोकांना एका दिवसाचा होम करण्यासाठी तब्बल २.५१ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
3 / 9
नोएडातील डॉक्टरला मारहाण केल्यामुळं चर्चेत आलेले करौली बाबा शंकर हवन विधीनं मोठ्या अडचणी दूर करण्याचा दावा करतात. सर्व प्रकारचे रोग आणि राजकीय उलथापालथही ठीक करण्याचा दावा ते करतात.
4 / 9
एक दिवसाच्या होमासाठी मोठी रक्कम आकारत असल्यानं त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र या प्रश्नांदरम्यान करौली बाबा संतोष सिंह भदौरिया यांनी एका दिवसाच्या हवनाची फी वाढवली आहे.
5 / 9
लोक उपचारासाठी डॉक्टरांना फी देखील देतात. असाध्य आजारांवर लोक लाखो रुपये खर्च करतात. त्याचप्रमाणे येथेही शुल्क आकारले जातं, असं यावर करौली बाबा यांनी म्हटलंय.
6 / 9
जर कोणाला येथे होम-हवन करायचं असेल तर आश्रमातर्फे ३५०० रुपयांचं हवन किट दिलं जाते. लोकांना किमान नऊ हवन करावे लागतील, ज्याची किंमत ३१,५०० रुपये असेल. नऊ दिवस आश्रमात राहून खाण्यापिण्याची सोय केली तर वेगळा खर्च होईल, असं त्यांनी सांगितलं.
7 / 9
ज्यांना नऊ दिवस हवन करता येत नाही किंवा ज्यांना त्वरीत उपचाराची गरज आहे त्यांच्यासाठी एका दिवसाचा खर्च १.५१ लाख रुपये होता, तो आता २.५१ लाख रुपये करण्यात आल्याचेही ते म्हणाले. होम-हवनाचे हे वाढलेले दर १ एप्रिलपासून लागू होतील.
8 / 9
करौली बाबा संतोष सिंह भदौरिया हे सध्या आपल्या वक्तव्यामुळे आणि दाव्यांमुळे चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांनी रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठं भाष्य केलं. दोन्ही देशांच्या नेत्यांची स्मृती पुसून आपण युद्ध थांबवू शकतो, असा दावा करौली बाबांनी केला आहे.
9 / 9
यापूर्वी करौली बाबा संतोष सिंह भदौरिया यांच्यावर एका भक्तानं मारहाणीचा आरोप केला होता. या घटनेचा व्हिडीओही समोर आला होता. बाबा आणि त्या व्यक्तीमध्ये वाद झाल्याचे दिसून येतंय. बाबांच्या आश्रमात दररोज तीन ते चार हजार भाविक येत असल्याचंही सांगण्यात येत आहे.
टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश