अवघ्या ३० मिनिटांत ३०० किमी अंतर गाठणार; देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 11:26 IST
1 / 10भारतीय रेल्वेचा प्रवास आणखी वेगवान आणि सुलभ करण्यासाठी केंदीय रेल्वे मंत्रालय सातत्याने वेगवेगळी पाऊले उचलत आहे. आता भारतीय रेल्वेने आणखी नवा पल्ला गाठला आहे2 / 10बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर काम करण्यासोबतच भारतात आता देशातील पहिला हायपरलूप रेल्वे ट्रॅक तयार झाला आहे. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती शेअर केली आहे. आयआयटी मद्राससोबत मिळून भारतीय रेल्वेने हा Hyperloop Track तयार केल्याचं त्यांनी सांगितले.3 / 10४२२ मीटर लांबीचा हा टेस्ट ट्रॅक - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, हा हायपरलूप ट्रॅक IIT मद्राससोबत मिळून तयार करण्यात आला आहे. याची लांबी ४२२ मीटर इतकी आहे. हायपरलूप ट्रॅक प्रकल्प आगामी काळात देशातील रेल्वे प्रवासाला आणखी गती मिळवून देणार आहे. 4 / 10रेल्वेचा प्रवास जलद करण्यात याची महत्त्वाची भूमिका असेल. रेल्वेने टेक्नोलॉजीसह कॉमर्शियलाइजेशनसाठी आयआयटी मद्रासला तिसऱ्यांदा १ मिलियन डॉलरचे अनुदान मंजूर केले आहे.5 / 10कसा असतो हायपरलूप ट्रॅक? - Hyperloop Railway Track हे असं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ज्यात ट्रेन एका खास प्रकारे बनवण्यात आलेल्या ट्यूबमधून चालवली जाते. या हायस्पीडने सार्वजनिक वाहतूक आणखी वेगाने करण्यास फायदेशीर ठरणार आहे. 6 / 10आता देशातील पहिला हायपरलूप ट्रॅक तयार करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच यातून ट्रेनची चाचणी होण्याची अपेक्षा आहे.देशात वॅक्यूम ट्यूबमधून चालणाऱ्या हायपरलूप ट्रेनची सुरुवात झाल्यास हा देशातील परिवहन क्षेत्रातील पाचवा आणि सर्वात वेगवान प्रवासाचा मार्ग असेल.7 / 10रिपोर्टनुसार, हायपरलूप ट्रेनचं स्पीड ६००-१२०० किमी प्रतितास इतके असेल. भारतीय रेल्वेचा प्रवास या हिशोबाने सरासरी ३०० किमी अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण करू शकेल. 8 / 10बुलेट ट्रेनहून जास्त स्पीडने धावू शकते ट्रेन- देशात बुलेट ट्रेन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी पहिली बुलेट ट्रेनचं काम वेगाने पुढे जातंय. भारतीय रेल्वेची देशात एप्रिल २०२६ पर्यंत पहिली बुलेट ट्रेन धावेल. 9 / 10भारतात सुरू होणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनचा वेग ३२० किमी प्रतितास असू शकतो जो हायपरलूप ट्रॅकच्या माध्यमातून हे अंतर ३० मिनिटांच्या आसपास असेल. जगातील अनेक देशात हायपरलूक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. युरोपात सर्वात लांब हायपरलूप टेस्ट ट्रॅक खुला करण्यात आला आहे. ही सुविधा येणाऱ्या काळात लोकांसाठी खूप फायदेशीर ठरणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. 10 / 10२०५० पर्यंत युरोपच्या चहुबाजूने हायपरलूप ट्रॅकचं जाळं टाकलं जाईल. एकूण १०,००० किमी लांब हे हायपरलूप नेटवर्क पसरलेले असेल. वर्जिन हायपूरची चाचणी ९ नोव्हेंबर २०२० रोजी अमेरिकेच्या लास वेगासमध्ये ५०० मीटर एका ट्रॅक पॉडसह लॉन्च केली. त्याचा वेग १६१ किमी प्रतितास आहे.