शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ilker Ayci Air India: एअर इंडियाच्या नव्या सीईओंमागे रॉ हात धुवून लागणार; भारतद्वेष्ट्या तुर्कस्तानी राष्ट्राध्यक्षांशी घनिष्ट संबंध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 2:19 PM

1 / 10
टाटा ग्रुपने एअर इंडिया ताब्यात घेऊन महिनाही उलटलेला नसताना टाटाने मोठा निर्णय घेतला होता. काश्मीरवरून भारतद्वेश करणाऱ्या तुर्कस्तानच्या इल्केर आइची (Ilker Ayci) यांना एअर इंडियाचा नवीन सीईओ आणि एमडी म्हणून निवडले होते. परंतू हा निर्णय टाटाला गोत्यात आणण्याची शक्यता आहे. कारण या इल्केर यांच्या मागे आता भारताची गुप्तहेर संघटना हात धुवून मागे लागणार आहे.
2 / 10
इल्केर आइची (Ilker Ayci) हे तुर्कस्तानी एअरलाईन्सचे प्रमुख होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात या एअरलाईनला खूप चांगले दिवस दाखविले. यामुळे टाटाने त्यांची निवड केली होती. परंतू, आधीच एअर इंडिया अडचणीत असताना टाटाच्या या निर्णयामुळे आणखी संकटे वाढू नयेत अशी अपेक्षा सरकारने ठेवली आहे.
3 / 10
यामुळे इल्केर यांच्या मागे आता रॉचा ससेमिरा लागणार आहे. टाटाने दुष्मन देशाच्या व्यक्तीला एअरलाईनचे एवढे मोठे पद कसे काय दिले याबाबत आता सवाल उठू लागले आहेत. यामुळे केंद्रीय गृहमंत्रालय यासाठी रॉची मदत घेण्याची शक्यता आहे.
4 / 10
महत्वाची बाब म्हणजे इल्केर यांचे तुर्कस्तानच्या राष्ट्राध्यक्षांशी चांगले संबंध आहेत. इल्केर हे २०१५ ते २०२१ या काळात तुर्कीश एअरलाईनचे सीईओ होते. यामुळे त्यांचा आगापिछा तपासण्यात येणार आहे.
5 / 10
सरकारी सूत्रांनी सांगितले की, ही नियमित प्रक्रिया आहे. ज्या भारतीय कंपन्यांवर विदेशी व्यक्ती अधिकारी नियुक्त होतो, त्याची तपासणी केली जाते, असे हा अधिकारी म्हणाला. परंतू यावेळचा हेतूच वेगळा असल्याचे दिसत आहे.
6 / 10
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी प्रत्येकवेळी काश्मीरवरून भारतविरोधी भूमिका मांडली आहे. त्यांनी पाकिस्तानची साथ दिली आहे. अनेकदा प्रक्षोभक वक्तव्ये देखील केली आहेत. इल्केर यांच्याशी जवळीक असल्याने यामागे काही अघटित घडू नये, म्हणून रॉ इल्केर यांच्या बॅकग्राऊंडची चौकशी करणार आहे.
7 / 10
यातून त्यांच्यामुळे भारतीयांच्या हिताचे काही नुकसान होणार आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. किंवा तुर्की एअरलाइन्सवर असताना त्यांच्याबद्दल काही वाद झाला आहे का हे देखील पाहिले जाणार आहे.
8 / 10
पाकिस्ताननंतर आता तुर्कस्तान 'भारतविरोधी कारवायांचे' दुसरे सर्वात मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. केरळ आणि काश्मीरसह देशातील सर्व भागांतील कट्टर इस्लामिक संघटनांना तुर्कीकडून निधी मिळत आहे.
9 / 10
आइची हे तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये १९७१ मध्ये जन्मलेले आहेत. त्यांनी Bilkent University मधून डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल एडमिनिस्ट्रेशनमधून पदवी घेतलेली आहे. 1997मध्ये त्यांनी Marmara University विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशनमध्ये मास्टर केले आहे.
10 / 10
चंद्रशेखरन यांनी नियुक्तीची घोषणा करताना म्हटलेले की, इल्केर हे एव्हिएशन इंडस्ट्रीचे लीडर आहेत. त्यांनी त्यांच्या हुशारीने Turkish Airlines ला यश मिळवून दिले. Tata Group मध्ये आम्ही त्यांचे स्वागत करतो, ते एअर इंडियाला एका वेगळ्या युगात नेऊन ठेवतील.
टॅग्स :Air Indiaएअर इंडियाterroristदहशतवादी