शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जानेवारीपासून होणार आहेत 'हे' महत्वाचे बदल...वेळीच जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 3:23 PM

1 / 8
नवीन वर्षात मोठे बदल होणार आहेत. एक जानेवारीपासून बँकिंग, इन्शुरन्स आणि प्राप्तीकर पासून एकूण 6 बदल होणार आहेत. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अडचणी येण्य़ाची शक्यता जास्त आहे.
2 / 8
31 डिसेंबर ही प्राप्तीकर भरण्याची यंदाची शेवटची तारीख असून या दिवशी 5 लाख रुपय़ांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या करदात्यांनी कर न भरल्यास 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच आजच्या दिवशी कर भरल्यास 5 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 10 हजारांचा दंड भरून करदाता 31 मार्च 2019 पर्यंत कर भरू शकतात. 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी हा दंड 1 हजार रुपयेच राहणार आहे.
3 / 8
1 जानेवारीपासून मॅग्नेटीक स्ट्रीपचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड बंद होणार आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हे करण्यात येत आहे. मॅग्नेटिक स्ट्रीपचे कार्ड कमी सुरक्षित असतात. यामुळे काही बँकांनी कार्ड बदलण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, जुने कार्ड तोपर्यंत सुरु राहणार आहेत. आरबीआयने 2016 मध्येच बँकांना स्ट्रीप कार्डांऐवजी चिप असलेली कार्डे वितरित करण्य़ास सांगितले होते. यासाठी 31 डिसेंबर, 2018 ची मुदत देण्यात आली होती.
4 / 8
1 जानेवारीपासून नॉन सीटीएसचे चेक बंद होणार आहेत. आरबीआयच्या आदेशांनुसार जे ग्राहक सध्या अशा प्रकारचे चेकबुक वापरत आहेत, त्यांनी बँकेकडून नवीन चेकबुक घ्यावे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने 12 डिसेंबरपासूनच नॉन-सीटीआस चेक घेणे बंद केले आहे.
5 / 8
सीटीएस चेक म्हणजे चेक ट्रंकेशन सिस्टिम. यानुसार चेकची एक इलेक्ट्रॉनिक इमेज बनविण्यात येते. यामुळे कागदी चेकला एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये क्लिअरन्ससाठी पाठविण्याची आवश्यकता राहणार नाही. हा चेक ऑनलाईनच क्लिअर होणार आहे. यामुळे वेऴ वाचणार आहे शिवाय बँकांचा खर्चही वाचणार आहे.
6 / 8
एखादी कार असावी असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, नव्या वर्षात कारच्या किंमती कंपन्या वाढविणार आहेत. वाढता खर्च, अबकारी कर आदी यामागे असून सर्वच कंपन्यांनी दर वाढविण्याचे जाहीर केले आहे. या कारच्या किंमतींमध्ये 40 हजारांपर्यंत वाढ होणार आहे.
7 / 8
मोटर इन्शुरन्समध्ये यंदापासून 15 लाखांचा अपघात विमा कंपन्यांना द्यावा लागणार आहे. यासाठी इरडाने नवीन नियम जारी केले असून वाहन मालक किंवा चालकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबाला ही रक्कम मिळणार आहे. यासाठी वाहनाच्या विमा रकमेबरोबर 750 रुपयांचा अतिरिक्त रक्कम भरावी लागणार आहे. हे सर्वांनाच बंधनकारक आहे.
8 / 8
1 जानेवारीपासून इंदोर एअरपोर्टवर प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या सूचना एकदाच देण्यात येणार आहेत. यानंतर विमानांची माहीती डिजिटल डिस्प्लेवर देण्यात येणार आहे. शिवाय प्रवाशांना विमानाची माहिती एसएमएसवर देण्यात येणार आहे. ध्वनी प्रदूषणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ही सोय केवळ आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच असते.