in aadhaar card how many times you can change your name and address
आधार कार्डवरील नाव आणि पत्ता किती वेळा बदलता येईल? जाणून घ्या, सविस्तर... By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2022 5:24 PM1 / 6नवी दिल्ली : आधार कार्डशिवाय (Aadhaar Card) आजच्या काळात कोणतेही आर्थिक काम पूर्ण करणे अवघड आहे. आधार हे आता आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते सरकारी योजनांचा लाभ घेण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. त्यामुळे आधार कार्ड असण्यासोबतच त्यावर नोंदवलेली तुमची माहिती सुद्धा पूर्णपणे बरोबर असणे महत्त्वाचे आहे.2 / 6तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये कोणत्याही प्रकारचे अपडेट करायचे असल्यास ते सहज करता येईल. तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नाव आणि पत्ता अपडेट (Address and Name Update in Aadhaar) करू शकता. मात्र यासाठीही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कोणाचेही नाव आणि पत्ता त्याच्या आधारमध्ये वारंवार अपडेट होऊ शकत नाही.3 / 6देशातील कोणत्याही नागरिकाला त्याच्या संपूर्ण आयुष्यात एकदाच आधार क्रमांक जारी केला जातो. हे आधार कार्ड भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) द्वारे जारी केले जाते. आधार कार्डमध्ये 12-अंकी विशिष्ट क्रमांक असतो, ज्यावरून संबंधित नागरिकाची माहिती समोर येते. यामध्ये पत्ता, पालकांचे नाव, वय यासह अनेक माहिती नोंदवली जाते. आधार बनवताना एखादी माहिती चुकीची टाकली गेली असेल तर ती दुरुस्त केली जाऊ शकते परंतु यासाठी UIDAI ने मर्यादा निश्चित केली आहे.4 / 6UIDAI ने कोणत्याही आधार कार्ड धारकासाठी पत्ता बदलण्याची मर्यादा निश्चित केली आहे. UIDAI नुसार, एक आधार कार्ड धारक त्याच्या आधार डेटामध्ये त्याचे नाव आयुष्यात फक्त दोनदा बदलू शकतो. तसेच, तुम्ही तुमची जन्मतारीख फक्त एकदाच आधारमध्ये बदलू शकता. आधार डेटामध्ये तुम्ही तुमचे नाव वारंवार बदलू शकत नाही. तुम्ही आयुष्यात फक्त एकदाच आधारमध्ये जेंडरची माहिती अपडेट करू शकता.5 / 6आधारमध्ये कोणतेही बदल करण्यासाठी, तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. तरच तुम्ही कोणत्याही सुधारणा करू शकाल. लक्षात ठेवा की नाव, पत्ता किंवा जेंडर संबंधित माहिती अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे तुमचा रजिस्टर्ड फोन नंबर असणे आवश्यक आहे. कारण त्यावरील OTP शिवाय तुम्ही तुमच्या आधार डेटामध्ये कोणतेही बदल करू शकणार नाही.6 / 6जर तुम्हाला स्वतः बदल करायचा असेल तर UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन लॉगिन करा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP येईलप. तो प्रविष्ट करा. लॉगिन केल्यानंतर, होमपेजवर जा आणि प्रोसीड टू अपडेट आधारवर क्लिक करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. नंतर नाव बदलण्याचा (Name change) पर्याय निवडा आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट स्कॅन करून अटॅच करा. त्यानंतर सबमिट करा आणि 'ओटीपी सेंड' हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाका. ओटीपी टाकल्यानंतर तुमचे नाव बदलाचा अर्ज सबमिट होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications