In October, earthquake tremors were felt more than 50 times in various states of India.
सप्टेंबरमध्ये ३५, ऑक्टोबरमध्ये ५० वेळा भारत हादरला; जमिन एवढी का थरथरतेय?, जाणून घ्या! By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 12:10 PM1 / 6आज पहाटे राजधानी दिल्ली आणि लगतच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. राजधानीतील अनेक भागात रात्री 1.57 च्या सुमारास या भूकंपाच्या धक्क्यांनी लोक अचानक जागे झाले. दिल्लीसोबतच मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, मणिपूर, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये देखील मध्यरात्री भूकंपाचे हादरे जाणावले. 2 / 6नेपाळमधील दोती जिल्ह्यात बुधवारी पहाटे 6.3 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या घटनेत एक घर कोसळून जवळपास सहा जणांचा मृत्यू झाला. याचबरोबर, बुधवारी रात्री दोनच्या सुमारास दिल्ली आणि परिसरात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार (एनसीएस) , भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. नेपाळमध्ये गेल्या पाच तासांतील हा दुसरा भूकंप आहे. 3 / 6नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, ऑक्टोबरमध्ये भारतातील विविध राज्यांमध्ये 50 पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात 10 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय हिमाचलमध्ये 6, कर्नाटकात 5, उत्तराखंडमध्ये 4, आसाम-तेलंगणा आणि राजस्थानमध्ये ३ वेळा, गुजरात-अंदमान आणि छत्तीसगडमध्ये 2-2 वेळा भूकंप झाले. याशिवाय मणिपूर, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये तीनदा भूकंप झाले.4 / 61 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान भारतात 35 भूकंप झाले. महाराष्ट्रात सर्वाधिक 7 वेळा, लडाखमध्ये 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. महाराष्ट्रातील भूकंपाची तीव्रता 1.7 ते 2.6 इतकी होती. अरुणाचल प्रदेशात 2, आसाममध्ये 3, गुजरातमध्ये 2, हिमाचलमध्ये 2, जम्मू-काश्मीरमध्ये 3, मणिपूरमध्ये 3, मेघालयमध्ये 1, पंजाबमध्ये 1, राजस्थानमध्ये 1, उत्तराखंडमध्ये 1 आणि अंदमानमध्ये 3 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले.5 / 6पृथ्वी प्रामुख्याने चार थरांनी बनलेली आहे. अंतर्गाभा, बाह्यगाभा, प्रावरण आणि भूकवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. आता हा 50 किमी जाडीचा थर अनेक विभागांमध्ये विभागला गेला आहे, ज्याला टेक्टोनिक प्लेट्स म्हणतात. म्हणजेच पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग 7 टेक्टोनिक प्लेट्सने बनलेला आहे. या प्लेट्स कधीही स्थिर नसतात, त्या सतत फिरत असतात, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या दिशेने जातात तेव्हा त्या एकमेकांवर आदळतात. 6 / 6काही वेळा या प्लेट्सही तुटतात. त्यांच्या धडकेमुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. कधी कधी हे धक्के खूप कमी तीव्रतेचे असतात त्यामुळे ते जाणवतही नाहीत. तर कधी कधी त्यांची तीव्रता इतकी जास्त असते की जमिनीला भेगा पडतात. आणखी वाचा Subscribe to Notifications