आमदाराच्या कंपनीवर इन्कम टॅक्सची धाड; कोट्यवधीच्या रोख रकमेसह सापडले ४५० कोटींचे काळे धन By बाळकृष्ण परब | Published: February 23, 2021 2:41 PM
1 / 6 प्राप्तिकर विभागाने मध्य प्रदेशमधील बैतूल येथील सोया उत्पादन बनवणाऱ्या समूहाच्या विविध ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यामध्ये तब्बल ४५० कोटींहून अधिक किमतीची बेहिशोबी मालमत्ता उघडकीस आली आहे. 2 / 6 प्राप्तिकर विभागाने १८ फेब्रुवारी रोजी बैतूल, सतना, मुंबई, सोलापूर आणि कोलकाता अशा २२ ठिकाणी छापेमारी केली होती. हे छापे बैतूलमधील काँग्रेस आमदार निलय डागा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांवर टाकण्यात आले. 3 / 6 पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार या छाप्यामध्ये आठ कोटी रुपयांची रोख रक्कम, ४४ लाख रुपये किमतीचे परकीय चलन जप्त करण्यात आले. तसेच ९ बँक लॉकरसुद्धा सील करण्यात आले. या समुहाने कोलकाता येथील शेल कंपन्यांमधून मोठ्या प्रीमियरवर शेअरच्या माध्यमातून २९५ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जमवली होती. 4 / 6 प्राप्तिकर विभागाच्या कारवाईच्या फेऱ्यात आलेल्या कंपनीच्या चालकांनी ज्या कंपन्यांच्या विक्रीचा दावा केला होता. त्या कंपन्या सांगितलेल्या पत्त्यावर अस्तित्वात नव्हत्या. त्यासोबतच बेहिशोबी मालमत्तेमध्ये ५२ कोटी रुपयांबाबत माहिती मिळाली. कंपनीकडून दावा करण्यात आला की, हा त्यांच्या लाभ आहे. मात्र तपासामध्ये दिसून आले की, हा लाभ ज्या कंपन्यांच्या माध्यमातून होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामधील अनेक कर्मचाऱ्यांच्या नावावर नोंद आहे. या कंपन्यांच्या संचालकांना अशा प्रकारचे ट्रान्झॅक्शन झाले असल्याचीही माहिती नव्हती. 5 / 6 तसेच २७ कोटी रुपयांची संपत्ती ही शेअर विकून कमावल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र शेअर्सच्या खरेदी-विक्रीमध्ये कोलकातास्थित शेल कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आली. यामध्येही शेअर्सची विक्री ही योग्य प्रकारे करण्यात आली नाही. प्राप्तिकर विभागाने डिजिटल मीडियामधील अनेक पुरावे गोळा केले आहे. यामध्ये लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह, पेन ड्राइव्ह यांचा समावेश आहे आहे. आता पुढील तपास केला जात आहे. 6 / 6 निलय डागांचे नाव मध्य प्रदेशमधील आघाडीच्या तेल व्यापाऱ्यांमध्ये घेतले जाते. तसेच निलय डागा हे आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. गतवर्षी त्यांनी शिवराज सिंह चौहान यांचा उल्लेख डंपर सिंह चौहान असा केला होता. त्यावरून मोठा वाद झाला होता. निलय डागा यांचे वडील विनोद डागा हेसुद्धा काँग्रेसचे आमदार राहिले होते. डागा यांच्या व्यापार हा मध्य प्रदेशसोबतच, छत्तीसगड आणि महाराष्ट्रामध्ये पसरलेला आहे. आणखी वाचा