शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Independence Day 2021: भारत स्वतंत्र झाला तेव्हा किती होता दूध, पेट्रोल आणि सोन्याचा भाव, एक रुपयात काय काय मिळायचं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 1:31 PM

1 / 9
आज आपला देश भारत आपला ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. मात्र ७४ वर्षांपूर्वी नव्या नव्याने स्वातंत्र्य झालेल्या आपल्या देशाचे चित्र आतापेक्षा खूप वेगळे होते. त्याबाबत तुम्ही वाचले किंवा ऐकले असेल. गेल्या ७४ वर्षांमध्ये भारताने विविध क्षेत्रात आगेकूच केली आहे. नव्या आव्हानांचा सामनाही केला आहे. मात्र स्वातंत्र्यापासून आजपर्यंत देशासमोर एक मोठे आव्हान आहे ते म्हणजे महागाईचे.
2 / 9
अशा परिस्थितीत आज आपण भारत स्वतंत्र झाला होता. तेव्हा महागाईची परिस्थिती काय होती. या ७५ वर्षांत प्रमुख वस्तूंच्या किमतीमध्ये काय बदल झाला आहे, हे जाणून घेऊया. वस्तूंचे तेव्हाचे दर आणि आताचे दर यांची तुलना केली असता प्रत्येक वस्तूच्या दरामध्ये तब्बल १०० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसत आहे. जी वस्तू ७५ वर्षांपूर्वी काही पैशांना मिळत असे तीच वस्तू खरेदी करण्यासाठी आज १०० रुपयांपेक्षा अधिकची रक्कम खर्च करावी लागते. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे पेट्रोल-डिझेलपासून सोन्या चांदीपर्यंत सर्वच वस्तूंची किंमत प्रचंड प्रमाणात वाढली आहे.
3 / 9
पेट्रोलचा विचार केल्यास १९४७ मध्ये पेट्रोल २७ पैसे प्रति लिटर दराने मिळत असे. मात्र आज पेट्रोलसाठी तब्बल १०० हून अधिक रुपये मोजावे लागतात.
4 / 9
१९४७ मध्ये दैनिक वृत्तपत्राची किंमत १३ पैसे होते. मात्र आता त्यासाठी किमान ५ रुपये मोजावे लागतात.
5 / 9
१९४७ मध्ये दिल्लीहून मुंबईला जाण्यासाठीच्या विमानाचे तिकीट १४० रुपये एवढे होते. मात्र आता त्यासाठी ८ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतात.
6 / 9
देश स्वतंत्र झाला तेव्हा सिनेमाच्या तिकिटाची किंमत ही ३० पैसे होती. मात्र आज सिनेमाच्या तिकिटासाठी किमान २५० रुपये मोजावे लागतात.
7 / 9
तर दुधाची स्थितीही तशीच आहे. आधी दूध १२ पैसे प्रतीलिटर दराने मिळत असे. मात्र आज एक लिटर दुधासाठी ५० ते ६० रुपये मोजावे लागतात.
8 / 9
१९४७ मध्ये दहा ग्रॅम सोन्याची किंमत ही १०० रुपयांपेक्षा कमी होती. मात्र आता सोन्याचा भाव ५० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
9 / 9
मात्र गेल्या ७५ वर्षांत भारताचे चित्र खूप बदलले आहे. भारताने अनेक क्षेत्रांमध्ये खूप विकास साधला आहे. तसेच आज अनेक क्षेत्रांमध्ये भारत यशाची नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. त्यामुळे अनेक बाबतीत भारत अन्य देशांच्या तुलनेत वेगळा ठरत आहे.
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाMarketबाजार