शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारत-चीन तणाव निवळण्याची शक्यता; दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांची उद्या बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 7:02 PM

1 / 10
लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर येथील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. मंगळवारी कोर कमांडर स्तरावर तिसरी बैठक होणार आहे.
2 / 10
गेल्या एका महिन्यांत कोर कमांडर स्तरावर दोन्ही देशांमधील ही तिसरी बैठक होणार आहे. यावेळी भारताकडून ही बैठक चुशूल येथे आयोजित केली आहे. गेल्या दोन बैठका चीनच्या बाजूने मोल्डो येथे घेण्यात आल्या होत्या.
3 / 10
बैठकीतील एजेंडा डिसएंजेगमेंटसाठी दोन्ही पक्षांनी केलेले प्रस्ताव पुढे नेण्यावर आहे. सद्य परिस्थितीत तणाव कमी करण्यासाठी सर्व वादग्रस्त भागांवरही चर्चा केली जाईल.
4 / 10
यापूर्वी कोर कमांडर स्तरावर अखेरच्या दोन बैठका 6 जून आणि 22 जून रोजी घेण्यात आल्या. 14 कोर कमांडर लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग हे भारताच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
5 / 10
यापूर्वी 22 जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलएसी) तणाव कमी करण्यासाठी मॅरेथॉन बैठक घेण्यात आली होती. सुमारे 11 तास चाललेली ही बैठक चिनी सैन्याच्या विनंतीनुसार बोलविण्यात आली होती.
6 / 10
कोर कमांडर स्तराची बैठक चीनकडून मोल्डो होती झाली. गलवानमध्ये चीनशी झालेल्या संघर्षानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ही बैठक होती.
7 / 10
सूत्रांच्या माहितीनुसार, एलएसीवर चीन आणि भारत यांच्यात कोर कमांडर स्तरीय बैठक झाली. चर्चेदरम्यान, लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी भारताच्यावतीने या बैठकीचे नेतृत्व केले तर चीनच्यावतीने मेजर जनरल लियू लिन सहभागी झाले होते.
8 / 10
गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर लष्कारी अधिकाऱ्यांमध्ये मोठी चर्चा झाली होती. एलएसीवरील आधीची स्थिती कायम ठेवणे हा या बैठकीमागील हेतू आहे.
9 / 10
दरम्यान, गलवान खोऱ्यात दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. 15 जूननंतर सैन्यांमध्ये संघर्ष झाल्याचे वृत्त नाही, पण दोन्ही बाजूचे वातावरण तणावपूर्ण आहे. हा तणाव मिटवण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
10 / 10
15 जून रोजी लडाखमधील एलएसी सीमेवर गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे सैन्य यांच्यात हिंसक चकमक झाली. यात भारताचे 20 जवान शहीद झाले. तर अनेक सैनिक चीनमध्ये मारले गेले. पात्र, चीनने मारल्या गेलेल्या सैनिकांच्या संख्येविषयी कोणतीही माहिती सार्वजनिक केलेली नाही.
टॅग्स :ladakhलडाखIndian Armyभारतीय जवानIndiaभारतchinaचीन