India China FaceOff India Captured Chinese Post In Chushul Village Amid Pangong Tso Clash
India China FaceOff: ...अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिले By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2020 12:26 PM1 / 11लडाखच्या सीमावर्ती भागातील तणाव कायम आहे. गेल्या ४ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने उभं ठाकलं आहे.2 / 11१५ जूननंतर २९-३० ऑगस्टला चिनी सैन्यानं पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला.3 / 11एका बाजूला चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळून लावताना भारतीय जवानांनी काही महत्त्वाच्या जागांवरील आपली पकड आणखी मजबूत केली. त्यामुळे चीनची आगळीक भारताच्या पथ्यावर पडली आहे.4 / 11पँगाँग त्सो सरोवर परिसरातील काही मोक्याच्या जागांवरील भारताची पकड आणखी मजूबत झाल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. 5 / 11भारतीय जवानांना चीनकडून असलेल्या धोक्याची कल्पना येताच त्यांनी लगेच तेथील चौक्यांवर पोझिशन्स घेतल्या. या चौक्यांचं भौगोलिक महत्त्व अतिशय मोठं आहे. त्यामुळे भारतीय जवानांना त्यांचा लाभ मिळाला.6 / 11चिनी सैन्यानं भारतीय जवानांच्या ताब्यात असलेल्या भागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न उधळला गेला. 7 / 11चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून स्पेशल ऑपरेशन्स बटालियननं पँगाँग सरोवर जवळील डोंगराळ भागात तैनात आहे. त्यांची पकड आधीच्या तुलनेत आणखी मजबूत आहे.8 / 11भारतीय जवान आता पँगाँग त्सोच्या दक्षिण किनाऱ्यावरील उंच भागात तैनात आहेत. त्यामुळे चीनच्या तुलनेत भारतीय जवानांची पोझिशन उत्तम आहे.9 / 11चीनकडून घुसखोरी होणार असल्याची माहिती मिळताच भारतीय जवान उंचावर गेले. याचा फायदा त्यांना चीनची घुसखोरी रोखताना झाला.10 / 11पँगाँग सरोवरच्या उत्तर किनाऱ्यावर चिनी सैन्य फिंगर फोरमधील उंचावर जाऊन बसलं आहे. उंचीच फायदा घेण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे.11 / 11दक्षिण किनाऱ्यावर भारतानं चीनला त्यांच्याच रणनीतीचा वापर करून प्रत्युत्तर दिलं आहे. दक्षिण किनाऱ्यावरील डोंगराळ भागात भारतीय जवानांनी उंच भागांवर पोझिशन्स घेतल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications