India China Faceoff : India china air fire power comparison
फायर पावरच्या बाबतीत इंडियन एअरफोर्स ड्रॅगनला भारी; चीनच्या कोणत्याही कोपऱ्यात करू शकते हल्ला! By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 7:36 PM1 / 14लडाखच्या गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी सैन्याच्या भ्याड कृत्यानंतर संपूर्ण देशातच चीनविरोधात संतापाची लाट आहे. चिनी सैन्याच्या धूर्तपणाला चोख उत्तर देण्यासाठी एलएसीवर भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. मिराज-2000 असो, अथवा सुखोई, अपाचे हेलीकॉप्टर असो अथवा चिनूक, सर्वांचाच निशाणा अचूक आहे आणि भारतीय हवाई दलाची संपूर्ण ताकद सध्या हाय अलर्टवर आहे. 2 / 14एलएसीच्या ग्राउंड झीरोवर जमिनीपासून ते आकाशापर्यंत नजर ठेवली जात आहे. तसेच चीनला उत्तर देण्यासाठी एअरफोर्स पूर्णपणे तयार आहे. एवढेच नाही, तर हवाई दल प्रमुखांनी हैदराबाद येथील हवाई दलाच्या पासिंग आउट परेडमध्येही, भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे म्हटले होते.3 / 14असे असताना युद्धाची परिस्थिती ओढवलीच, तर भारत आणि चीनची हवाई ताकद किती आहे आणि कोण कोणावर भारी पडू शकतो हे जाणणेही आवश्यक आहे. भारतीय हवाई दल कोणत्याही परिस्थितीत चीनला चकित करू शकते. कारण भारतीय हवाई दलाकडे उंचावर उडण्याचा जबरदस्त अनुभव आहे.4 / 14भारताने लडाखमध्ये लढाऊ विमान मिराज-2000 तैनात केले आहे. हेच फायटर जेट बालाकोट एअरस्ट्राइकदरम्यान वापरण्यात आले होते. सुखोई-30 देखील अलर्टवर आहे. भारताकडे असलेले लढाऊ हेलिकॉप्टर्स सातत्याने सीमेची टेहळणी करत आहेत. अपाचे हेलीकॉप्टरची नजरही एलएसीवरील हालचालींवर आहे. चिनूकच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर सैनिक आणि शस्त्रसाठा फॉरवर्ड फ्रन्टला पाठवला जात आहेत. आवश्यक साहित्यासह Mi-17V5 हेलिकॉप्टरदेखील सातत्याने कार्यरत आहे.5 / 14भारताच्या पश्चिमेकडील एअरकमांडकडे 75 फायटर एअरक्राफ्ट आहेत. तर 34 ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट आहेत. ते श्रीनगर, लेह, पठानकोट, आदमपूर आणि अंबालामध्ये तैनात आहेत. केंद्रीय एयरकमांड म्हणजे बरेली, ग्वालियर आणि गोरखपूर सेक्टरमध्ये 94 फायटर एअरक्राफ्ट आणि 34 ग्राउंड अटॅक एअरक्राफ्ट आहेत. याशिवाय पूर्व एअरकमांड म्हणजे जलपाईगुडी, तेजपूर आणि छाबुआ सेक्टरमध्ये 101 फायटर एअरक्राफ्ट आहेत.6 / 14चीनचा विचार केल्यास चीनची हवाई ताकद वेगवेगळ्या भागांत तैनात नाही. चीनची पश्चिमेकडील थियेटर कमांडमध्ये 157 फायटर एअरक्राफ्ट आहेत. अगदी बीनचूक निशाणा साधणारे 20 यूएव्ही आहेत. 12 ग्राउंड अटॅक यूएव्ही आणि 8 EA-03 यूएव्ही आहेत.7 / 14चीनकडे 104 न्युक्लिअर मिसाइल्स आहेत. जी संपूर्ण भारतात कोठेही डागली जाऊ शकतात. तर भारताकडे अग्नि 3 लॉन्चर सिस्टम आहे. हिच्या सहाय्याने संपूर्ण चीनमध्ये कोणत्याही कोपऱ्यात हल्ला केला जाऊ शकतो.8 / 14चीनकडे इंटरकॉन्टिनेन्टल बॅलेस्टिक मिसाइलदेखील आहे. याची रेंज 11,000 आणि 7000 किलो मीटर एवढी आहे. हे मिसाइल भारतच नाही तर अमेरिकेपर्यंतही पोहोचू शकते.9 / 14DF-21 मिसाइलची रेंज 2,150 किलोमीटर एवढी आहे. या मिसाइलच्या सहाय्याने चीन दिल्लीला टार्गेट करू शकतो. याशिवाय चीनकडे इशांन्य भारत आणि भारताच्या पूर्वेकडे न्युक्लिअर स्ट्राइक करण्याची क्षमता आहे.10 / 14दुसरीकडे भारताकडे अन्विक क्षमता असलेली 51 विमानं आहेत. जे ग्रॅव्हिटी बॉम्बने सुसज्ज आहेत. तसेच भारत आपल्या अग्नि-2 लॉन्चरनेही चीनच्या अनेक भागांना टारगेट करू शकतो.11 / 14भारत आणि चीनच्या हवाई शक्तीचा विचार केल्यास चीन एकाच वेळी भारतीय एअर डिफेन्सचा सामना करू शकत नाही. चीनकडे भांभावून टाकणारी मारक क्षमता नाही. तर भारताकडे लढावू विमानं आणि अटॅकर्स हेलिकॉप्टर्सना ऊंचावर उडवण्याचा बिनतोड अनुभव आहे. याबाबतीत चीन भारताच्या मागे आहे.12 / 14येथे हेही विसरता येणार नाही, की भारताने आपले सैनिक खास उत्तर आणि पूर्वी सीमांवर चीनचा सामना करण्यासाठी तयार केले आहे. एवढेच नाही, तर भारताच्या बाजूने रणनीतिक लाभही आहे. कारण चीनचे सैन्य विखुरलेले आहे. 13 / 14चीनच्या तुलनेत भारताने जमीन, हवा आणि समुद्रात गुप्तपणे आपली शक्ती विभागली आहे. हे चीनच्या दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. 14 / 14भारताच्या संरक्षण तयारीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे, की डेव्हलपमेन्ट असो, अॅक्शन असो, काउंटर अॅक्शन असो, जमिनीवर असो, पाण्यात असो अथवा आकाशात असो, आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी जे-जे आवश्यक आहे, ते-ते करत आहेत. आज आपल्याकडे, अशी क्षमता आहे, की कुणी आपल्या एक इंच भू-भागाकडेही डोळे वटारून पाहू शकत नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications