India china Faceoff : pm narendra modi addressed indian soldiers in leh ladakh
लडाखच्या 'कुरुक्षेत्रावर' मोदी असं काही बोलले; जवानांमध्ये १२ हत्तींचे बळ संचारले! By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 4:27 PM1 / 9चीनसोबत सीमेवर सुरू असलेल्या तणावातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी लेह दोरा केला. त्यांचा हा दौरा अचानकपणे ठरला होता. त्यांच्या या दौऱ्याने सर्वच जण अचंबित झले आहेत. या वेळी पंतप्रधानांसोबत चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) बिपिन रावतही उपस्थित होते. यावेळी लष्कराच्या आणि हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी मोदींना सीमेवरील प्रत्यक्ष स्थितीची माहिती दिली.2 / 9लेह येथील वॉर मेमोरियल हॉल ऑफ फेम येथे जाऊन पंतप्रधान मोदींनी जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी लष्कराच्या रुग्णालयात जाऊन जखमी जवानांचीही भेट घेतली. यानंतर मोदींनी जवानांना संबोधित करत, त्यांच्या पराक्रमाचा गौरव केला. 3 / 9पंतप्रधान मोदी म्हणाले, देशाची सुरक्षितता आपल्या हाता आहे, आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीत आहे. याचा केवळ मलाच नव्हे, तर संपूर्ण देशाला विश्वास आहे आणि देश निश्चिंत आहे. आपल्या भुजा, आपल्या सभोवताली असलेल्या या पाहाडांप्रमाणेच बलदंड आहेत. आपली इच्छाशक्ती या पहाडांप्रमाणे प्रचंड आहे.4 / 9जवानांना उद्देशून मोदी म्हणाले, आपले धैर्य, आपले शौर्य आणि भारत मातेच्या मान-सन्मानाच्या संरक्षणासाठी आपले समर्पण अतुलनीय आहे. आपण ज्या कठीन परिस्थितीत आणि ज्या ऊंचीवर एक ढाल बनून भारत मातेचे रक्षण आणि सेवा करता, त्याची तुलना जगात कुणीही करू शकत नाही.5 / 9नुकताच, आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी जो पराक्रम दाखवला, त्यांने संपूर्ण जगाला भारताच्या शक्तीचा परिचय झाला आहे. गलवान खोऱ्यात हौतात्म्य आलेल्या जवानांना मी पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचा पराक्रम आणि सिंहनादाने ही धरती आजही त्यांचा जयजयकार करत आहे. 6 / 9भारतीय जवानांचे कौतुक करताना मोदी म्हणाले, १४ कोरच्या शौर्याचे किस्सेत तर सर्वांनाच परिचित आहेत. जगाने आपला अदम्य साहस पाहिला आहे. आपल्या शौर्यगाथा घरा-घरात सांगितल्या जातात. भारताच्या शत्रूने आपले फायरही पाहिले आहे, आणि फ्यूरीदेखील अनूभवली आहे.7 / 9मोदी म्हणाले, आज देशातील प्रत्येक नागरिक आपल्या देशातील जवानांच्या शौर्यापूढे नतमस्तक होऊन त्यांना नमन करत आहे. आज प्रत्येक भारतीयाची छाती आपला पराक्रम आणि शौर्य पाहून चौडी झाली आहे. १४ कोरच्या शौर्याची गाथा तर घरा घरात ऐकवली जात आहे. 8 / 9जवानांना प्रोत्साहित करताना मोदी म्हणाले, आपल्याकडे म्हटले जाते, 'वीर भोग्य वसुंधरा'. म्हणजे, वीर आपल्या शस्त्राच्या बळावरच मातृभूमीचे संरक्षण करतात. ही भूमी वीर 'भोग्या' आहे. हिचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी आपले सामर्थ आणि संकल्प हिमालयाहूनही उंच आहे. हे सामर्थ्य आणि संकल्प, मी आज आपल्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर स्पष्टपणे पाहू शकतो. 9 / 9जवानांच्या शौर्याची गाथा गात मोदी म्हणाले, आपण त्याच भूमीची संतान आहात, जीने हजारो वर्षे अनेक आक्रमक आणि अत्याचार करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. आपण, बासरी धारण करणाऱ्या श्रीकृष्णाची पूजा करणारे आणि सुदर्शन चक्र धारण करणाऱ्या श्रीकृष्णाला आदर्श मानणारे लोक आहोत. आणखी वाचा Subscribe to Notifications