नाशिक : काठे गल्ली-पखालरोड भागात मध्यरात्री दगडफेक करणाऱ्या दंगलखोरांच्या ५७ दुचाकींसह १३ संशयित समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तुफान दगडफेकीत ३१ पोलीस अधिकारी, कर्मचारी मध्यम ते किरकोळ जखमी झाले आहेत.
आता लडाखमध्ये 'Division 72' ढाल बनणार; चीनचा धोका पाहता भारतीय लष्करानं बनवला PLAN
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 14:42 IST
1 / 10भारतीय सैन्याकडून पूर्व लडाखच्या चीन सीमेवर बंदोबस्तासाठी नवीन तुकडी तैनात करणार आहे. या तुकडीचं नाव ७२ Division असं असेल, जी LAC वर देखरेख ठेवेल. सैन्याच्या सध्या अस्तित्वात असलेल्या ३ तुकड्यांशिवाय एक अतिरिक्त तुकडी बनवली जाणार आहे. या तुकडीवर सीमा क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी दिली जाईल.2 / 10सैन्याचा हा निर्णय ऑर्डर ऑफ बॅटलच्या मोठ्या रणनीतीचा भाग आहे. ज्यात सध्याचे सैनिकांचीही पुनर्नियुक्ती केली जाईल. सैन्याच्या कुठल्याही विभागात मेजर जनरल यांच्या नेतृत्वात १० ते १५ हजार सैनिक असतात. त्यात ३-४ ब्रिगेड असतात त्यांचे नेतृत्व बिग्रेडियर करतात3 / 10पूर्व लडाखमध्ये ७२ डिवीजन अंतर्गत एक ब्रिगेड हेडक्वार्टरही उघडण्यात आले आहे. इथून कामालाही सुरूवात झाली आहे. लेहच्या १४ फायर अँन्ड फ्यूरी कॉर्प्स अंतर्गत ७२ डिवीजन सुरक्षेसाठी तैनात केले जातील. सध्या या परिसरात एक Counter Insurgency यूनिट यूनिफॉर्म फोर्स आहे. जी लवकरच ७२ डिविजनच्या नेतृत्वात काम करेल.4 / 10पूर्व लडाखमध्ये चीन आणि भारताची सीमा ८३२ किमी लांब आहे. याठिकाणचा तणाव पाहता तिथं कायमस्वरूपी एक विभाग तैनात ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. LAC वर पेट्रोलिंग करण्यावरून भारत आणि चीन यांच्यात मागील ऑक्टोबर महिन्यात एक सामंजस्य करार झाला होता. 5 / 10या करारानुसार, एलएसीवर सर्वकाही तसेच होईल जंस जून २०२० पूर्वी होते. जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली होती. या झटापटीमुळे सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर काही काळ पेट्रोलिंगही थांबवण्यात आले होते.6 / 10भारत आणि चीन यांच्यात एलएसीवर ५ ठिकाणी संघर्ष आहे. त्यात देपसांग, डेमचोक, गलवान खोरे, पेंगाँग, गोगरा हॉट स्प्रिंग या जागांचा समावेश आहे. २०२० नंतर अनेकदा चर्चा झाली, त्यानंतर गलवान खोरे, पेंगाँग आणि हॉट स्प्रिंगहून दोन्ही देशाचे सैन्य मागे हटले परंतु देपसांग आणि डेमचोक इथं सैन्यात तणावामुळे संघर्षाचा धोका कायम होता. 7 / 10आता सामंजस्य करारामुळे या ५ ठिकाणाहून भारत आणि चीनचे सैन्य मागे हटले आहे. याठिकाणी पूर्वीसारखे पेट्रोलिंगही सुरू करण्यात आले आहे. देपसांगमध्ये पेट्रोलिंग करणे भारताच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे कारण काराकोरम खिंडीजवळील दौलत बेग हे ओल्डी पोस्टपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराळ भागात हा सपाट भूभाग आहे ज्याचा वापर सैन्य कार्यवाहीसाठी केला जाऊ शकतो. 8 / 10तर डेमचोक सिंधु नदीजवळ येतो, जर याठिकाणी चीनचं नियंत्रण आलं तर उत्तर भारतातील राज्यांना होणाऱ्या पाणी पुरवठा यावर त्याचा परिणाम जाणवू शकतो. त्यामुळे भारताने याचीही गंभीर दखल घेतली आहे. 9 / 10अलीकडेच भारत-चीन सीमा मुद्द्यांवरील सल्ला आणि समन्वय (WMCC) च्या ३३ वी बैठक पार पडली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयातील सहसचिव (पूर्व आशिया) गौरांगलाल दास यांनी केले, तर चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि महासागर व्यवहार विभागाचे महासंचालक हाँग लियांग यांनी केले.10 / 10या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, WMCC बैठक सकारात्मक आणि रचनात्मक वातावरणात झाली आणि दोन्ही बाजूंनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (LAC) परिस्थितीचा व्यापक आढावा घेतला.