india china standoff indias allies pitching in with weapons ammunition
India China Standoff : चीनचा सामना करायला पुढच्याच महिन्यात येतंय राफेल, 'हे' बलाढ्य मित्र भारताला देणार घातक शस्त्रास्त्र By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 4:36 PM1 / 9इस्रायलने कारगिल युद्धाच्या वेळीही भारताला शक्य तेवढ्या लवकर आणि शक्य तेवढ्या वेगाने घातर शस्त्रास्त्र उपलब्ध करून दिली होती. आता भारत आणि चीन लडाखमध्ये आमने-सामने आहेत. यावेळीही इस्रायल भारताला, अनेक शस्त्रास्त्रे पुरवणार आहे, ज्याचे उत्तर चीनकडेही नसेल. तर दुसरीकडे फ्रान्समधूनही भारताच्या सेवेत अन् शत्रूचा सामना करण्यासाठी राफेल देशात पोहोचत आहे.2 / 9फ्रान्समधून लवकरच येतय राफेल - फ्रान्ससोबत झालेल्या सोद्यानुसार भारताला 36 राफेल जेट मिळणार आहेत. पहिलं राफेल लढाऊ विमान 27 जुलैला भारताला मिळेल. योजनेप्रमाणे पूर्वी 4 राफेल लढाऊ विमानं अंबाला येथे येणार होती. मात्र आता 8 विमानांना सर्टिफिकेशन मिळणार आहे. 3 / 9राफेल आकाशातील अजेय योद्धा - राफेल विमानाला आकाशातील अजेय योद्धा, असे म्हटले जाते. हवेतून हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रेही याच्या सहाय्याने डागली जाऊ शकतात. एवढेच नाही, तर याचा निशाणाही अचूक असतो.4 / 9भारताच्या मदतीसाठी धावला मित्र इस्रायल - इस्रायलने भारताला कारगिल युद्धाच्या वेळीही लवकरात लवकर शस्त्रास्त्रे उपलब्ध करून दिली होती. आता चीनसोबतच्या वादातही इस्रायल भारताला डिफेन्स सिस्टम द्यायला तयार आहे आणि ती लडाखमध्ये तैनात करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलकडून हे घातक शस्त्र लवकरात लवकर भारताला मिळणार आहे. 5 / 9बराक-8 मिसाइल डिफेन्स सिस्टमसाठी भारताची बऱ्याच दिवसांपासून इस्रायलसोबत बोलणी सुरू होती. भारताने इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजसोबत (आयएआय) बराक-8 मिसाइल डिफेन्स सिस्टमसाठी तब्बल 777 मिलियन डॉलरचा (जवळपास 5,687 कोटी रुपये) सौदा केला आहे. यासंदर्भात खुद्द इस्रायल एअरोस्पेस इंडस्ट्रीजनेच 2018मध्ये माहिती दिली होती. 6 / 9मित्र रशिया लवकरच देणार 'ब्रह्मास्त्र' - भारताचा अगदी जुना मित्र, रशियाही भारताला लवकरच मिसाइल डिफेन्स सिस्टम S-400 देत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मॉस्को दौऱ्यानंतर लवकरात लवकर ही सिस्टम भारताला देण्यासंदर्भात रशियाने शब्द दिला आहे. 7 / 9टँक ते लढाऊ विमानं प्रत्येक आघाडीवर भारत तयार - भारताकडे मोठ्या प्रमाणावर रशियन शस्त्रास्त्रे आहेत. यामुळे भारताने टँकच्या गोळ्यांपासून ते लढाऊ विमानांच्या सहाय्याने डागता येतील असे बॉम्बदेखील रशियाकडून मागवले आहेत. याशिवाय भारतीय सैन्यानेही अॅन्टी टँक मिसाइल्सची मागणी केली आहे. रशिया ही सर्व शस्त्रास्त्रे लवकरत लवकर भारताला पुरवणार आहे.8 / 9अमेरिकाही कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला तयार - भारताचा मित्र अमेरिकाही प्रत्येक आघाडीवर भारताच्या मदतीसाठी तयार आहे. सध्या अमेरिका गुप्त माहिती बरोबरच सॅटेलाइट इमेजदेखील भारताला पाठवत आहे. सॅटेलाइट इमेजच्या माध्यमाने लडाख सीमेवरील चीनच्या सर्व कुरापती जगासमोर येत आहेत. 9 / 9याशिवया, अमेरिकेने भारताला सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताने अमेरिकेला M777ची ऑर्डरदेखील दिली आहे. पाहाडी भागांतील युद्धासाठी M777 अत्यंत उपयुक्त आणि यशस्वी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications