India china tension India china have prepared the war on the border
भारत-चीनदरम्यान LACवर युद्धाची तयारी? टँक्स, अधुनिक शस्त्रास्त्रे तैनात By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 9:17 PM1 / 11लडाखमध्ये भारत-चीन तणाव वाढताना दिसत आहे. भारत आणि चीन सीमेत लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोलवरील (LAC) स्थिती युद्धासारखी दिसत आहे. दोन्ही बाजूंच्या सैनिकांनी एलएएसीजवळ टँक्स, मशीनगन आणि आधुनिक शस्त्रास्त्रे तैनात केली आहेत. तर एअरफोर्सची ताकदही वाढवली जात आहे.2 / 11लडाखमध्ये LACवर भारत-चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांत वाद सोडविण्यासाठी चर्चा सुरू आहे. मात्र, शनिवारी चुशुल येथे झालेली ब्रिगेड-कमांडर स्थरावरील बैठक अनिर्णित ठरली आहे.3 / 11एलएसीवर सध्या प्रचंड तणाव आहे. चीन सीमेवर टाईप 15 लाईट टँक्स, इंफंट्री फायटिंग व्हिकल्स, AH4 हॉवित्झर गन्स, HJ-12 अँटी टँक्स गायडेड मिसाइल्स, NAR-751 लाईट मशीनगन, W-85 हेवी मशीनगन आणि अँटी-मटेरियल स्नायपर रायफल्ससह भारताला आव्हान देत आहे.4 / 11तर भारताने प्रत्युत्तरात एलएसीवर T-90 भीष्म टँक्स, BMP-2K इंफंट्री फायटिंग व्हिकल्स, M777 अल्ट्रा लाईट हॉवित्झर गन्स, स्पाइक अँटी-टँक गायडेड मिसाइल्स, NEGEV लाईट मशीनगन्स आणि TRG स्नायपर रायफल्स तैनात केल्या आहेत. 5 / 11भारताने लडाख भागात सुखोई 30, मिग 29, मिराज 2000, चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. तर चीननेही एलएसीला लागून असलेल्या भागात सैन्य तळांसोबतच एअरफोर्सची ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. 6 / 11चीनने तिबेटच्या उतांग भागात एअरबेस तयार केला आहे. हा एअरबेस एलएसीपासून केवळ 200 किमी अंतरावर आहे. याशिवाय चीनने चेंगदू J-20 स्टिल्थ लढाऊ विमान एलएसीवर सक्रीय केले आहेत. एवढेच नाही, तर चीनने अनू बॉम्बचा मारा करणाऱ्या बॉम्बर विमानांसह तिबेटमध्ये युद्धाभ्यासही सुरू केला आहे. 7 / 11फिंगर 4वर स्पेशल फ्रंटियर फोर्स आणि चिनी सेन्यातील अंतर केवळ 1.7 किमी, तर दक्षिण पेंगाँगमध्ये भारतीय जवान आणि चिनी सेन्यातील अंतर केवळ 170 मीटर एवढेच आहे.8 / 11रेजांगलामध्ये चिनी सैनिक आणि भारतीय जवानांपासून केवळ 500 मीटर अंतरावर आहेत. तसेच गोगरा पोस्टवर भारतीय माउंटेन ट्रुप्स आणि चिनी सेन्यातील अंतरही केवळ 500 मीटर एवढेच आहे.9 / 11चुशूलमध्ये भारत आणि चीनचे टँक समोरा-समोर आहेत. तर, देप्सांगमध्ये भारतीय बॅटल टँक आणि चिनी बॅटल टँकमध्ये केवळ 6 किमीचे अंतर आहे.10 / 11चीन नेहमीच भारताची कमकुवत बाजू हेरण्याचा प्रयत्न करतो आणि संधी साधून पुढे सरकत जमीन बळकावण्याचा कट आखतो.11 / 11यावेळी मात्र, चीन आपल्याच चालीत अडकला. चीनने कब्जा करण्यापूर्वीच भारतीय जवानांनी पेंगाँगच्या दक्षिणेकडील रणनितीक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. यामुळेच चीनचा तिळपापड झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications