शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

धोका वाढला! 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार; IIScचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:27 PM

1 / 12
देशात कोरोनानं हाहाकार माजवलेला असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. लॉकडाऊन केल्यानंतरही कोरोनाला रोखता आलेलं नाही.
2 / 12
गेल्या 24 तासांत देशात तब्बल 32 हजार 695 नवीन रुग्णांची नोंद झाली असून, जवळपास 606 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात आतापर्यंत सापडलेली सर्वात जास्त रुग्णांची संख्या आहे.
3 / 12
देशातील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या सध्या 9 लाख 68 हजार 876 एवढी झाली आहे. विशेष म्हणजे 4 महिन्यांत देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा जाणार 1 कोटींच्या पार जाणार असल्याचा धक्कादायक अंदाज भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरू(IISc)ने वर्तवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
4 / 12
IIScच्या अभ्यासानुसार, सध्याच्या रुग्णवाढीनुसार 1 सप्टेंबरपर्यंत भारतात कोरोनाबाधितांची 35 लाख प्रकरणं समोर येतील. येत्या दीड महिन्यांदरम्यान 26 लाख नवीन रुग्ण सापडणार असल्याचं IISCनं सांगितलं आहे.
5 / 12
भारतात 1 सप्टेंबरपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या 10 लाखांच्या घरात असेल. त्यामुळे कोरोना एवढ्यात काही जाणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
6 / 12
देशात सध्या देशात 3 लाख 31 हजार 146 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, परिस्थिती बदलल्यास 1 सप्टेंबरपर्यंत देशात 20 लाख एकूण रुग्ण असतील.
7 / 12
सध्या देशात एकूण मृतांचा आकडा 24 हजार 915 एवढा झाला आहे. IISc ने हा अंदाज कोरोनाच्या ट्रेंडनुसार व्यक्त केला आहे.
8 / 12
IIScच्या अभ्यासानुसार 1 नोव्हेंबरपर्यंत देशात 1 कोटी कोरोना रुग्ण असतील. तर जानेवारी 2021पर्यंत देशात खतरनाक व्हायरसमुळे तब्बल 10 लाख लोकांचा जीव जाऊ शकतो.
9 / 12
IISc राज्यांच्या अंदाजानुसार सध्याच्या ट्रेंडनुसार 1 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या 6.3 लाख, दिल्ली 2.4 लाख, तामिळनाडू 1.6 लाख आणि गुजरातमधील कोरोनाचे रुग्ण 1.8 लाखांपर्यंत पोहोचू शकते.
10 / 12
जर परिस्थिती अधिकच बिघडली तर मार्चअखेरपर्यंत भारतात कोरोनाची 6.2 कोटी प्रकरणं असतील.
11 / 12
या काळात देशात 82 लाख सक्रिय प्रकरणे असू शकतात. तर 28 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
12 / 12
या काळात देशात 82 लाख सक्रिय प्रकरणे असू शकतात. तर 28 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या