शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताच्या हाती खजिना लागला! तांबे शोधता शोधता या राज्यातील तीन जिल्ह्यांत सोन्याचा साठा सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 16:58 IST

1 / 7
सध्या ज्याच्याकडे सर्वाधिक सोने तो श्रीमंत आणि ताकदवान मानला जातो. अगदी खासगी आयुष्यातही आणि जगातही. म्हणूनच अमेरिका प्रबळ देश मानला जातो. जगातील कोणत्याही संकटावर सोन्यामुळे मात करता येते. म्हणून त्या त्या देशांच्या केंद्रीय बँका सोन्याचा साठा वाढवत असतात. सध्याच्या युद्धजन्य काळात भारताच्या हाती मोठा खजिना सापडला आहे. एका राज्यात मोठ्या प्रमाणावर सोन्याचे साठे सापड़ले असून इतर ठिकाणी त्याचा शोध सुरु करण्यात आला आहे.
2 / 7
भारतीय शास्त्रज्ञांना ओडिशामध्ये सोन्याचे साठे सापडले आहेत. ओडिशा नेहमीच नैसर्गिक संसाधने आणि खनिजांचे केंद्र राहिले आहे. आता सोनेच सापडल्याने पुन्हा एकदा राज्य चर्चेत आले आहे.
3 / 7
ओडिशाच्या अनेक जिल्ह्यांत सोन्याचे साठे सापडले असून इतर ठिकाणीही शोध सुरु आहे, असे राज्याचे खाण मंत्री बिभूती जेना यांनी म्हटले आहे. लवकरच यांचा लिलाव केला जाईल, असेही ते म्हणाले.
4 / 7
सुंदरगड, नबरंगपूर, केओंझार आणि देवगड सारख्या जिल्ह्यांमध्ये शास्त्रज्ञांना सोन्याचे मोठे साठे सापडले आहेत. बौद्ध, मलकानगिरी, संबलपूर सारख्या भागातही शोध सुरू आहे. तसेच मरेदिही, सुलेपत आणि बदामपहार या भागात देखील शोध सुरु केला जाणार आहे.
5 / 7
आदासा-रामपल्ली येथे सोन्याचे साठे आधीच सापडले होते. यामुळे शास्रज्ञांच्या आशा वाढल्या होत्या. यामुळे आजुबाजुच्या भागात शोध सुरु करण्यात आला होता.
6 / 7
ओडिशा सरकार देवगडमधील पहिल्या सोन्याच्या खाण ब्लॉकचा लिलाव करण्याची योजना आखत आहे. जीएसआय या भागात तांब्याचा साठा शोधत असताना सोने सापडले आहे.
7 / 7
सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत भारत जगात आठव्या क्रमांकावर आहे. आरबीआयकडे ८४०.७६ टन सोने आहे. भारतीयांकडे असलेले सोने वेगळेच. अशा प्रकारे भारत खूप मोठा सोन्याची मागणी असणारा देश आहे. यामुळे ओडिशामधील सोन्याचे साठे हे भारताची मोठी गरज भागविणारे ठरणार आहेत.
टॅग्स :Goldसोनं