शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात आहे जगातील सर्वात मोठं निवासस्थान, अंबानींचं अँटीलियाही याच्यासमोर काहीच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 6:53 PM

1 / 6
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेल्या मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेली अँटीलिया इमारत नेहमीच चर्चेत असते. मुंबईतील उच्चभ्रू वस्तीत असलेली ही इमारत भारतातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला एका अशा घराबाबत माहिती देणार आहोत, जे भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठं निवासस्थान आहे.
2 / 6
गुजरातमधील बडोदा शहरात असलेला लक्ष्मी-विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठं निवासस्थान आहे. हा राजप्रासाद गायकवाड राजघराण्याने बांधला होता. तसेच हा राजवाडा बांधकामशैली आणि ऐतिहासिक ठेव्याचं उत्तम उदाहरण आहे.
3 / 6
बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी हा राजप्रासाद १८८० मध्ये बांधला होता. अनेक कलाकृतींनी भरलेला लक्ष्मी-विलास पॅलेस हा इंग्लंडच्या राजघराण्याचं निवासस्थान असलेल्या बकिंगहॅम पॅलेसच्या तुलनेत चार पटीने मोठा आहे.
4 / 6
तसेच एका अंदाजानुसार सध्या या आलिशान राजमहालाची किंमत सुमारे २० हजार कोटी रुपये एवढी आहे. सध्या या वास्तूमध्ये समरजितसिंह गायकवाड, त्यांची पत्नी राधिकाराजे गायकवाड आणि त्यांच्या दोन कन्या वास्तव्यास आहेत.
5 / 6
बडोद्याच्या तत्कालीन महाराजांनी वास्तूविशारद रॉबर्ट फेलोज चिसोल्म याच्या मदतीने हा राजप्रासाद बांधला होता.
6 / 6
सुमारे ७०० एकर परिसरामध्ये पसरलेल्या लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये १७० खोल्या आहेत. चार मजले उंच असलेल्या या राजवाड्यामध्ये सामान्य लोकांनाही प्रवेश मिळतो. त्यासाठी तुम्हाला १५० रुपयांचं तिकीट काढावं लागतं. तसेच येथील संग्रहालयात फिरण्यासाठी ६० रुपयांचं तिकीट काढावं लागतं.
टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय