India is the second highest spender for the G20 conference, at Rs 50 crore doller
जी-20 परिषदेसाठी सर्वाधिक खर्च करणारा भारत तिसरा देश, हजारो कोटींचा खर्च By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 1:16 PM1 / 10भारताने यावर्षीच्या जी२० शिखर परिषदेचे आयोजन केले असून राजधानी दिल्लीत जय्यत तयारी आणि ग्रँड नियोजन करण्यात आलंय. 2 / 10जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, जर्मनी इत्यादींसह सुमारे ३० देशांचे प्रमुख आणि १४ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 3 / 10सुमारे वर्षभरापासूनच आयोजनाची तयारी सुरू होती. अनेक बैठका, सम्मेलने इत्यादींचे आयोजन झाले. एकूणच संपूर्ण आयोजनासाठी प्रचंड खर्च येतो. 4 / 10जाणून घेऊ या आतापर्यंत जी२० परिषदेच्या आयोजनासाठी कोणत्या देशाने किती खर्च केला. या यादीत पहिल्या क्रमांकावर चीन आहे.5 / 10चीनने २०१६ साली या परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी, तब्बल २४० कोटी डॉलर एवढा खर्च चीनने केला होता. चीननंतर कॅनडाचा दुसरा नंबर लागतो. 6 / 10कॅनडाने जी२० परिषदेसाठी तब्बल १०० कोटी डॉलर रुपये खर्चे केले होते. २०१० मध्ये कॅनडात ही परिषद पार पडली होती. 7 / 10कॅनडानंतर सर्वाधिक खर्च करणारा देश हा तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला असून भारताने सुमारे ५० कोटी डॉलर एवढा खर्च केला आहे. म्हणजे ४,१५६ कोटी खर्च केले8 / 10गतवर्षी २०२२ मध्ये इंडोनेशियाने जी २० परिषदेचे आयोजन केले होते, त्यावेळी ३.३ कोटी डॉलर खर्च केला होता. हा आत्तापर्यंतचा सर्वात कमी खर्च आहे.9 / 10२०१० पासून या परिषदांच्या आयोजनाच्या खर्चाची माहिती घेतल्यास, १० देशांनी या परिषदांचं आयोजन केलं होतं. 10 / 10सर्वाधिक खर्च कशावर? सुरक्षा, आदरातिथ्य, नवी दिल्लीचे सौंदर्यीकरण, भारत मंडपम, रस्ते व इतर सुविधा आणखी वाचा Subscribe to Notifications