india reports 37593 new COVID19 cases 34169 recoveries and 648 deaths in the last 24 hrs
Coronavirus : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, ३७ हजारांपेक्षा अधिक नवे बाधित; ४७ टक्क्यांची वाढ By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 10:49 AM1 / 9कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला होता. देशात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची नोंद झाली होती. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असला तरी धोका अद्यापही पूर्णपणे टळलेला नाही. 2 / 9भारतात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात ३७ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.3 / 9मंगळवारी देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. परंतु बुधवारी मंगळवारच्या तुलनेत १२ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली.4 / 9आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी देशात कोरोनाच्या ३७५९३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी तब्बल नव्या रुग्णांच्या संख्येत ४७ टक्क्यांची वाढ झाली.5 / 9आरोग्य मंत्रायलाच्या आकडेवारीनुसार सध्या देशात ३,२२.३२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर भारतात आतापर्यंत ५९.५५ कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली. 6 / 9सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७.६७ टक्क्यांवर पोहोचला आहे. दुसरीकडे गेल्या चोवीस तासांत देशात ३४१६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी देशात २५४६७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती.7 / 9देशात गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी कोरोनाबाधितांची संख्या २० लाख, २३ ऑगस्ट रोजी ३० लाख आणि ५ सप्टेंबर रोजी ४० लाखांपेक्षा अधिक झाली होती. 8 / 9तर दुसरीकडे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ सप्टेंबर रोजी ५० लाख, २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाख आणि २९ ऑक्टोबर रोजी ८० लाख, २० नोव्हेंबर रोजी ९० लाखांच्या पार गेले होते. 9 / 9देशात १९ डिसेंबर रोजी कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटींच्या पार गेल्याची माहितीही समोर आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications