India to soon get dairy for donkey milk, one litre milk may sell for Rs 7,000
गाढवीनीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू होतेय, एक लिटरची किंमत ७००० रुपये, जाणून घ्या फायदे! By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 3:36 PM1 / 10सहसा लोक गाय, म्हैस, बकरी किंवा ऊंट या प्राण्यांचे दूध सेवन करताना आपण पाहिले असेल. तसेच, ग्रामीण भागात सर्रास गाय आणि म्हैशीच्या दुधाची डेअरी पाहिली असेल. पण, आता लवकरच गाढवीनीच्या दुधाची डेअरी सुरु करण्यात येणार आहे.2 / 10देशात पहिल्यांदाच गाढवीनीच्या दुधाची विक्री होणार आहे. हरियाणाच्या हिसारमध्येही दूध डेअरी सुरु करण्यात येणार आहे. या एक लिटर दुधाची किंमत 7000 रुपये आहे. 3 / 10गाढवीनीच्या दुधाची ही डेअरी लवकरच सुरू होणार आहे. गाढवीनीचे दूध हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीराची इम्यून सिस्टम ठीक करण्यासाठी हे दूध महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच, अनेक सौंदर्य उत्पादने (ब्युटी प्रॉडक्ट्स ) देखील या दुधापासून तयार केली जातात.4 / 10देशात राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र (एनआरसीई) हिसारमध्ये गाढवीनीच्या दुधाची डेअरी सुरु होत आहे. एनआरसीई हिसारमध्ये हलारी जातीच्या गाढवीनींच्या दुधाची डेअरी सुरु होणार आहे. त्यासाठी एनआरसीईने १० हलारी जातीच्या गाढवीनी मागवल्या आहेत. सध्या त्यांचे ब्रीडिंग केले जात आहे.5 / 10हलारी जातीच्या गाढवीनीच्या दुधाला औषधांचा खजिना म्हणतात. त्याच्या दुधात कर्करोग, लठ्ठपणा,अॅलर्जी यासारख्या आजारांशी लढण्याची क्षमता आहे. ही जात गुजरातमध्ये आढळते.6 / 10तज्ज्ञांच्या मते, बऱ्याचदा गाय किंवा म्हैशीच्या दुधामुळे लहान मुलांना अॅलर्जी होते. मात्र, हलारी जातीच्या गाढवीनीच्या दुधाने असे होत नाही. 7 / 10गाढवीनीच्या दुधात अँटिऑक्सिडेंट, अँटिएजिंग तत्व आढळतात. ते शरिरातील अनेक गंभीर आजारांवर मात करण्यासाठी क्षमता विकसित करतात.8 / 10ब्रीडिंगनंतर हाय डेअरीचे काम लवकरच सुरु होईल. गाढवीनीचे दूध बाजारात २००० ते ७००० रुपये प्रति लिटरपर्यंत विकले जाते. 9 / 10या दुधापासून ब्युटी प्रॉडक्ट्स सुद्धा तयार केले जातात. जे खूप महाग असतात. तसेच, गाढवीनीच्या दुधापासून साबण, लिपबाम, बॉडीलोशन तयार केले जाते.10 / 10गाढवीनीच्या दुधाची डेअरी सुरू करण्यासाठी एनआरसीई हिसारच्या केंद्रीय म्हैस संशोधन केंद्रात आणि करनालच्या नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी मदत घेतली जात आहे. ही दुध डेअरी सुरु झाल्यास अनेक लोकांना मोठा फायदा होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications