india to start bidding process by october to procure 6 submarines costing rs 55000 crore
समुद्रात चीनची दादागिरी रोखणार?, नव्या 6 पाणबुड्या खरेदीची भारताची तयारी By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 7:29 AM1 / 12गेल्या काही दिवसांपासून चीन भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. समुद्रातही चीनची दादागिरी दिवसागणिक वाढतच चालली आहे. त्यामुळे भारतही नौदल सामर्थ्य वाढवण्यावर भर देत आहे. 2 / 12भारतीय नौदलासाठी सहा पारंपरिक पाणबुड्या तयार करण्यासाठी 55,000 कोटी रुपयांच्या मेगा प्रकल्पाची निविदा प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत सुरू होणार आहे.3 / 12चिनी नौदलाची वाढती शक्ती लक्षात घेता ही पाणबुडी भारताची सामरिक क्षमता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, याबाबत सरकारी सूत्रांनी रविवारी माहिती दिली.4 / 12या पाणबुड्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत भारतात तयार केल्या जाणार आहेत. याअंतर्गत देशांतर्गत कंपन्यांना परदेशी संरक्षण कंपन्यांसोबत देशातील अत्याधुनिक लष्करी उपकरणे तयार करण्यासाठी कराराची परवानगी दिली जाईल. 5 / 12अंतिम यादीमध्ये भारतीय कंपन्यांचा समावेश एल अँड टी ग्रुप आणि गव्हर्नमेंट माझगाव डॉक लिमिटेड (एमडीएल) आहे, तर निवडलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये थ्यासिंक्रूप मरीन सिस्टम (जर्मनी), नवंतिया (स्पेन) आणि नेव्हल ग्रुप (फ्रान्स) यांचा समावेश आहे.6 / 12संरक्षण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी दोन भारतीय शिपयार्ड आणि पाच परदेशी संरक्षण कंपन्यांची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. 'मेक इन इंडिया'अंतर्गत हे सर्वात मोठा उपक्रम असल्याचं सांगितलं जात आहे. 7 / 12अंतिम यादीमध्ये भारतीय कंपन्यांचा समावेश एल अँड टी ग्रुप आणि गव्हर्नमेंट माझगाव डॉक लिमिटेड (एमडीएल) आहे, तर निवडलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये थ्यासिंक्रूप मरीन सिस्टम (जर्मनी), नवंतिया (स्पेन) आणि नेव्हल ग्रुप (फ्रान्स) यांचा समावेश आहे.8 / 12सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला संरक्षण मंत्रालय एमडीएल आणि एल अँड टीला आरएफपी देईल आणि कागदपत्रे मिळाल्यानंतर दोन्ही कंपन्या त्यांच्या तपशीलवार निविदा सादर करतील. यानंतर एल अँड टी आणि एमडीएलला निवडलेल्या पाच कंपन्यांमधून परदेशी भागीदार निवडावा लागेल.9 / 12नौदलाकडे सध्या 15 पारंपरिक पाणबुड्या आणि दोन अणु-समृद्ध पाणबुड्या आहेत. नौसेना हिंदी महासागर प्रदेशात चिनी सैन्याच्या वाढत्या उपस्थिती लक्षात घेता आपली क्षमता वाढविण्यावर भर देत आहे.10 / 12पाण्याखालील युद्ध वाढविण्यासाठी भारतीय नौदलाची अणुहल्ला क्षमता असलेल्या सहा पाणबुड्यांसह 24 नवीन पाणबुडी खरेदी करण्याची योजना आहे. 11 / 12नौदलाकडे सध्या 15 पारंपरिक पाणबुड्या आणि दोन अणु-समृद्ध पाणबुड्या आहेत. नौसेना हिंदी महासागर प्रदेशात चिनी सैन्याच्या वाढत्या उपस्थिती लक्षात घेता आपली क्षमता वाढविण्यावर भर देत आहे.12 / 12जागतिक नौदल विश्लेषकांच्या मते, चीनकडे 50 पेक्षा जास्त पाणबुड्या आणि सुमारे 350 जहाजं आहेत. पुढील आठ-दहा वर्षांत चीनकडे जहाजे आणि पाणबुडीची संख्या 500 पेक्षा जास्त होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications