Indian Air Force receives its first Apache Guardian attack helicopter
हवाई दलात 'अपाचे' हेलिकॉप्टर दाखल, पाक-चीन सीमेवर करणार देशाचं रक्षण By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2019 11:20 AM1 / 5भारताच्या हवाई दलात सर्वात शक्तिशाली अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश झाला आहे. अपाचे हेलिकॉप्टर अमेरिकेत बनविण्यात आले आहे. भारताने अमेरिकेसोबत 22 हेलिकॉप्टरचा करार केला होता. 2 / 5बोईंग एएच 64 अपाचे हेलिकॉप्टर जगातील सर्वात शक्तिशाली आणि घातक मानलं जातं. मागील वर्षी भारत आणि अमेरिकेत या हेलिकॉप्टर खरेदीबाबत करार करण्यात आला होता. पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर अपाचे हेलिकॉप्टर तैनात करण्यात येणार आहे. 3 / 5भारतीय हवाई दलात अपाचे हेलिकॉप्टरचा सहभाग झाल्याने वायूसेना आणखी सशक्त होणार आहे. डोंगराळ आणि जंगल परिसरात हेलिकॉप्टरचा वापर फायदेशीर ठरतो. अपाचे हेलिकॉप्टरची मारक क्षमता जास्त असल्याने भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे. 4 / 5अमेरिकेने या हेलिकॉप्टरचा वापर इराक आणि अफगाणिस्तानमध्ये शत्रुंचा मुकाबला करण्यासाठी केला होता. अपाचे हेलिकॉप्टर अशाप्रकारे बनविण्यात आलं आहे जे कोणत्याही परिस्थिती शत्रुंचा सामना करताना अयशस्वी होत नाही. 5 / 5अपाचे हेलिकॉप्टरचा वेग 280 किमी प्रतितास आहे. तसेच 16 एँन्टी टॅंक मिसाइल सोडण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications