Indian air force's sukhoi and miraj fighter plane refueling in the sky winning hearts hrb
हवाई दलाचा हवेतल्या हवेत असा पराक्रम...जो पाहून उर भरून येईल By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 1:30 PM1 / 10हवाई दलाला पुढील दोन महिन्यांत फ्रान्सची राफेल लढाऊ विमाने मिळणार आहेत. ही विमाने अद्वितीय असली तरीही भारताच्या ताफ्यात असलेली मिराज आणि सुखोई देखील काही कमी नाहीत. हे आज भारतीय हवाईदलाच्या पराक्रमी पायलटनी सिद्ध केले आहे. 2 / 10एक काळ होता, भारताकडे असलेली लढाऊ विमाने अंधारात उडू शकत नव्हती. इंधन भरण्यासाठी वारंवार खाली उतरावे लागत होते. आता याच हवाई दलाच्या ताफ्यात अशी विमाने आहेत की, ती हवेतल्या हवेतच एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात इंधन भरण्याची क्षमता ठेवतात. 3 / 10आजपर्यंत आपण असे ऐकलेले की, एक मोठे विमान हवेत उडत असते. त्यामध्ये मोठ मोठ्या इंधनाच्या टाक्या असतात. त्यातून लढाऊ विमाने हवेतल्या हवेत इंधन भरतात. पण भारतीय हवाईदलाने एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात इंधन भरण्याची क्षमता ठेवली आहे. 4 / 10हवाई दलाच्या पायलटनुसार असे करणे सोपे नसते. खूप जोखमीचे असते. भारतीय हवाईदलाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून उर अभिमानाने भरून येईल. 5 / 10पायलच्या म्हणण्यानुसार हे करणे खूप कठीण असते. हवेतून हवेत इंधन भरण्यासाठी दोन विमानांची उंचीची पातळी, वेग, वाऱ्याची दिशा आणि दोन छोटे पाईप हवेतल्या हवेत एकमेकांना जोडणे खूप कठीण असते. 6 / 10या फोटोमध्ये सुखोई 30MKI मधून मिराज २००० मध्ये इंधन भरण्यात येत आहे. 7 / 10असे करताना विमाने कोसळूही शकतात. अनेकदा अपघात होतात. 8 / 10हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा हा प्रयोग साधारण १०० वर्षांपूर्वी केला होता. 9 / 10पहिल्यांदा १९२३ मध्ये हवेतल्या हवेत लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यात आले होते. 10 / 10पहिल्यांदा १९२३ मध्ये हवेतल्या हवेत लढाऊ विमानांमध्ये इंधन भरण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications