ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - भारतीय जवान चंदू चव्हाण यांची आज पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली आहे. भारतीय अधिका-यांनी चंदू चव्हाण यांना वाघा सीमेहून ताब्यात घेतले आहे. भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईनंतर चंदू चव्हाण हे नजरचुकीनं पाकिस्तानात पोहोचले होते. 29 सप्टेंबर 2016पासून ते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. चंदू चव्हाण यांच्या सुटकेच्या बातमीने संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली. या कारवाईनंतर 36 राष्ट्रीय रायफल्सचे जवान शिपाई चंदू चव्हाण यांनी नकळत नियंत्रण रेषा ओलांडली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले. 29 सप्टेंबर 2016 पासून ते आतापर्यंत चंदू चव्हाण पाकिस्तानच्याच ताब्यात होते. या घटनेमुळे चव्हाण कुटुंबीयांसहीत संपूर्ण देश चिंतेत होता. चंदू पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची बातमी समजल्याचा धक्का पचवू न शकलेल्या त्यांच्या आजीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दरम्यान, चंदू चव्हाण यांना सुखरूप मायदेशी परत आणणार, असे आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आले. केंद्र सरकारने सातत्याने पाठपुरावा करत चंदू यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. भारतीय लष्कराकडून पाकिस्तानसोबत डीजीएमओ स्तरावर जवळपास 15 ते 20 वेळा चर्चा करण्यात आली. मात्र या चर्चेला पाकिस्तानकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात आली. यामुळे चव्हाणांच्या सुटकेची प्रक्रियेला वेग येऊ लागला. यानंतर चंदू चव्हाण सुखरूप असून लवकरच त्यांना मायदेशी आणण्यात येईल, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी एका कार्यक्रमादरम्यान दिली होती. अखेर आज केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश आले असून चंदू चव्हाण मायदेशी परतले आहेत. जळगावात आनंदोत्सवचंदू चव्हाण यांची सुटका झाल्याने जळगावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. कल्याणी नगर येथे राहणा-या त्यांच्या काकू लताबाई पाटील यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. Thankful to GoI;indebted to MoS Defence Subhash Bhamre ji & others for their efforts to bring him back-Sepoy Chandu Babulal Chohan's brother pic.twitter.com/T47a9Wz4cD— ANI (@ANI_news) 21 January 2017#FLASH Pakistan to return Sepoy Chandu Babulal Chohan, who inadvertently crossed the LoC on 29 September 2016.— ANI (@ANI_news) 21 January 2017Sepoy Chandu Babulal Chohan to be returned at 3 PM via Wagah Border, Punjab;he'll be debriefed & a spl medical check-up will be carried out.— ANI (@ANI_news) 21 January 2017