शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Indian Military Bases Outside India : 'या' देशांमध्ये आहेत भारताचे मिलिट्री बेस... जाणून घ्या संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 6:54 PM

1 / 7
परदेशी भूमीवर लष्करी तळ (मिलिट्री बेस) बांधण्याचा उद्देश लष्करी उपकरणे आणि सैनिकांचे संरक्षण करणे हा आहे. ऑपरेशन्ससह अनेक प्रकारच्या कामांसाठी प्रशिक्षण दिले जाते. तसेच, जे देश परदेशी लष्करी तळ बांधतात ते आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ताकद दाखवतात. संपूर्ण जगात अमेरिका हा एकमेव देश आहे, ज्याचे 38 आंतरराष्ट्रीय लष्करी तळ आहेत. चला जाणून घेऊया भारताचे लष्करी तळ कोणत्या देशांमध्ये आहेत?
2 / 7
ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे 130 किमी अंतरावर फरखोरमध्ये भारतीय लष्करी हवाई तळ आहे. हे भारतीय हवाई दल चालवते. या तळाला ताजिकिस्तानच्या हवाई दलाचा पाठिंबा आहे. हा भारताचा पहिला लष्करी तळ आहे, जो स्वतःच्या मातीबाहेर बांधला गेला. इराण आणि अफगाणिस्तानमधील चबहार बंदरातून वाहतूक सुविधा उपलब्ध आहे. येथे हवाई दलाने सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमाने तैनात केली आहेत.
3 / 7
भूतानमधील भारताचे लष्करी तळ हे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र आहे. त्याला इंडियन मिलिटरी ट्रेनिंग टीम (IMTRAT) म्हणतात. हे प्रशिक्षण केंद्र पश्चिम भूतानमध्ये आहे. त्याची स्थापना 1961-62 मध्ये झाली. या ठिकाणी भूतानच्या रॉयल भूतान आर्मीच्या (RBA) सैनिकांचे प्रशिक्षण होते. हे देशातील सर्वात जुने भारतीय लष्करी प्रशिक्षण केंद्र आहे. येथील कमांडंट भूतानच्या राजाला संरक्षणाच्या बाबतीत सल्ला देतात. कारण याठिकाणी संरक्षण मंत्री नाही आहे.
4 / 7
भारतीय लष्कराने उत्तर मादागास्करमध्ये लिसनिंग पोस्ट आणि रडार फॅसिलिटी उभारली आहे. हे 2007 मध्ये बांधले गेले. जेणेकरून हिंद महासागरातून जहाजांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. सागरी संप्रेषण ऐकले आणि समजले जाऊ शकते. याच्या मदतीने मादागास्करचे नौदल देखील पाळत ठेवते. घुसखोरी किंवा दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी मादागास्करचे लष्कर पुरेसे मजबूत नसल्याने भारतीय लष्कर त्यांना मदत करत आहे.
5 / 7
भारत सरकारने मॉरिशसच्या उत्तर अगालेगा बेटावर कोस्टल सर्व्हिलन्स रडार सिस्टम बसवली आहे. हे बेट हिंदी महासागरात आहे. ते बनवण्याचा उद्देश भारत आणि मॉरिशस दरम्यान लष्करी मदत निर्माण करणे हा होता. हे एक मोक्याचे ठिकाण आहे, जिथून खूप मोठ्या सागरी क्षेत्राचे थेट निरीक्षण केले जाते. हे संपूर्ण बेट भारतीय लष्करी तळ आहे.
6 / 7
ओमानमधील रास अल हद नावाच्या ठिकाणी भारतीय लष्कराने एक लिसनिंग पोस्ट तयार केली आहे. याशिवाय मस्कत नौदल तळावर भारताला बर्थिंगचे अधिकार आहेत. म्हणजे तिथे भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुड्या इत्यादींना इंधन वगैरेची मदत मिळते. याशिवाय Duqm मध्ये भारतीय वायुसेना आणि भारतीय नौदलाचा एक छोटा तळ आहे.
7 / 7
दरम्यान, परदेशी भूमीवर लष्करी तळ उभारण्याचे अनेक फायदे आहेत. पहिले म्हणजे तुम्ही कोणतेही प्रशिक्षण घेऊ शकता किंवा देऊ शकता. दुसरे म्हणजे, त्या देशातील लोकांमध्ये भारतीयत्वाचे वर्चस्व वाढते. प्रतिष्ठा वाढते. तसेच शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे जाते. दोन्ही देश एकत्रितपणे अनेक आंतरराष्ट्रीय सीमांवर आणि लष्करी तळावरून तेथे होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवतात.
टॅग्स :Indian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलindian air forceभारतीय हवाई दल