शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीय नौदलाचे शौर्य; समुद्री चाच्यांपासून 19 बंधकांची केली सुटका, पाहा थरारक Photo...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 10:14 PM

1 / 6
Indian Navy: भारतीय नौदलाने अरबी समुद्रात पुन्हा एकदा मोठे शौर्य दाखवले आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका INS शारदाला 31 जानेवारी 2024 रोजी सोमालियाच्या पूर्व किनाऱ्याजवळ इराणी नौकेवर समुद्री चाच्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने त्या नौकेवर पाळत ठेवण्यास सुरुवात करण्यात आली.
2 / 6
नौदलाने समुद्रात इराणी ध्वज असलेल्या एफव्ही ओमारी बोटीचा मागोवा घेतला. त्याचे लोकेशन INS शारदा युद्धनौकेवर पाठवण्यात आले. यानंतर युद्धनौका त्या बोटीच्या दिशेने वेगाने पुढे सरसावली. उमरी येथील मच्छिमारांना समुद्री चाच्यांनी दोन दिवस ओलीस ठेवले होते. अखेर 2 फेब्रुवारी 2024 रोजी शारदा युद्धनौकेला इराणी नौका दिसली.
3 / 6
नौदलाने प्रथम हेलिकॉप्टरद्वारे समुद्री चाच्यांना स्पष्ट इशारा दिला. यानंतर नौदल कमांडो स्पीड बोटीने ओमारी जहाजाच्या दिशेने निघाले. भारतीय कमांडो येत असल्याचे पाहून चाच्यांनी हार मानली. नौदलाने या जहाजातून 11 इराणी आणि 8 पाकिस्तानी ओलिसांची सुटका केली. यानंतर कमांडोंनी सातही सोमाली चाच्यांना ताब्यात घेतले.
4 / 6
दरम्यान, सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी भारतीय नौदलाच्या युद्धनौका हिंदी महासागर क्षेत्रात (IOR) सतत तैनात केल्या जातात. 2008 पासून भारतीय नौदलाने एडनच्या आखातात आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर चाचेगिरी विरोधी गस्तीसाठी अनेक तुकड्या तैनात केल्या आहेत.
5 / 6
भारतीय नौदलाने आतापर्यंत एकूण 3,440 जहाजे आणि 25,000 हून अधिक खलाशांची सुटका केली आहे. भारतीय नौदल हिंद महासागर क्षेत्रात सागरी सुरक्षेला चालना देण्यासाठी प्रादेशिक आणि अतिरिक्त-प्रादेशिक नौदल/सामुद्री दलांसोबत सक्रियपणे संलग्न आहे.
6 / 6
हजाजांना चाच्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय नौदल 25 भागीदार देश आणि 40 हून अधिक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत काम करत आहे. नौदलाला या प्रकरणांबाबत रिअल टाइम माहिती सतत मिळत असते.
टॅग्स :indian navyभारतीय नौदलCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरी