रेल्वेच्या चाकांना साखळीने बांधून कुलूप का लावतात? असा आहे नियम, कारण वाचून म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 13:46 IST
1 / 5भारतीय रेल्वे हे आपल्या देशातील प्रवास आणि दळणवळणाचं महत्त्वाचं माध्यम आहे. भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यवधी लोक रोज प्रवास करतात. दरम्यान, रेल्वेमध्ये अजूनही असे काही नियम प्रचलित आहेत, ज्याबाबत वाचून ऐकून अवाक् व्हायला होतं. 2 / 5असाच एक नियम आहे तो म्हणजे ट्रेनच्या डब्यांच्या चाकांना साखळदंडाने रुळांना बांधून ठेवण्याबाबतचा. इंग्रजांच्या काळापासून रेल्वेच्या चाकांना रुळांना बांधून ठेवण्याचा नियम रेल्वेमध्ये आहे. तसेच आज भारतीय रेल्वेचं आधुनिकिकरण झाल्यानंतरही हा नियम कायम आहे. 3 / 5बऱ्याच रेल्वे स्टेशनवर ट्रेनचा प्रवास संपल्यानंतर ट्रेनचा लोको पायलट आणि हेल्पर ड्युटी आटोपल्यावर ट्रेनला लूप लाईनवर उभी करून जातात. तेव्हा ट्रेनची चाकं साखळदंडाने रुळांना बांधून ठेवतात. इंग्रजांच्या काळात सुरू झालेला हा नियम अजूनही पाळला जातो. 4 / 5अशाप्रकारे स्टेशनमधील रुळांवर रेल्वेगाडी साखळदंडांनी बांधून त्यांना कुलूप लावल्याचं तुम्हीही कधीतरी पाहिलं असेलच. 5 / 5 याबाबत रेल्वेचे अधिकारी सांगतात की, सुरक्षेच्या दृष्टीने ट्रेनची चाकं रुळांना साखळीने बांधून त्यांना कुलूप लावलं जातं. यामागे आणखीही काही कारणं दिली जातात. मात्र रुळांवर असलेल्या किंचीत उतारामुळे ट्रेन आपोआप चालू शकते. त्यामुळे चाकांना साखळीने बांधून ठेवलं जातं.