शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कमी पैशात घ्या भारतभर फिरण्याचा आनंद, इंडियन रेल्वेने सुरू केली स्पेशल 'भारत दर्शन ट्रेन', जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 3:51 PM

1 / 8
नवी दिल्ली: अनेक महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम करुन थकला असाल आणि कुठेतरी फिरायच्या विचारात असाल तर इंडियन रेल्वेने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे.
2 / 8
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिज्म कॉर्पोरेशन (IRCTC) लवकरच एका भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन (Bharat Darshan Special Tourist Train) सुरू करणार आहे.
3 / 8
येत्या 29 ऑगस्टपासून ही ट्रेन सुरू होईल. या ट्रेनमधून तुम्ही भारतातील विविध ठिकाणी फिरू शकता. IRCTC च्या भारत दर्शन ट्रेनशिवाय दक्षिण भारत दर्शन आणि महाराष्ट्र दर्शन ट्रेनही सुरू आहेत.
4 / 8
IRCTC आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन या भारत दर्शन ट्रेनबाबत माहिती दिली आहे. इंडियन रेल्वेने सुरू केलेल्या या ट्रेनद्वारे 'Splendours of India' पॅकेज अंतर्गत भारत दर्शन करता येईल. हे पॅकेज 12 दिवस आणि 11 रात्रीचे आहे.
5 / 8
ही ट्रेन भारतातील अनेक मोठ्या शहरांमधून जाईल. यात हैदराबाद, अहमदाबाद, निष्कलंक महादेव सी टेंपल, अमृतसर, जयपूर आणि गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ यूनिटीसारख्या शहरांचा समावेश आहे. आयआरसीटीसीही भारत दर्शन ट्रेन 29 ऑगस्टपासून 10 पर्यंत असेल.
6 / 8
या ट्रेनसाठी तुम्ही मदुरै, डिंडिगुल, करूर, इरोड, सलेम, जोलारपेट्टई, कटपडी, MGR चेन्नई सेंट्रल, निलोर, विजयवाड़ावरन बोर्डिंग करू शकता. तर, उतरण्यासाठी विजयवाडा, निलोर, पेरांबुर, कट्टपड़ी, जोलरपिट्टई, सलेम, एरोड, करूर, डिंडिगुलऔर मदुरैपैकी एक जागा निवडावी लागेल
7 / 8
या पॅकेजचा ऐकून किराया 11,340 रुपये असेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला स्लीपर क्लासमध्ये प्रवास करता येईल. याशिवाय, नाइट स्टे, धर्मशाळेचा खर्च रेल्वे करेल. याशिवाय तुम्हाला मॉर्निंग टी, कॉफी, ब्रेकफास्ट, लंच डिनर आणि दररोज 1 लीटर पिण्याचे पाणी मिळेल.
8 / 8
यासोबतच ट्रॅव्हल इंश्योरेंस आणि सॅनेटायजेशन किटसारख्या सुविधाही रेल्वेकडून मिळतील. भारत दर्शन टूरसाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाइटवरुन बुकिंग करावी लागेल.
टॅग्स :railwayरेल्वेIndiaभारत