indian railways railtel content on demand service in trains to be launched this month
प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वेने प्रवास करणं होणार आता आणखी मजेशीर, सुरू करणार "ही" नवी सुविधा By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 11:36 AM1 / 12रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करत असतात. अनेकदा लांबपल्ल्याचा प्रवास करताना प्रवाशांना कंटाळा येतो. मात्र आता धावत्या रेल्वेतून प्रवास करताना तो प्रवास प्रवाशांना कंटाळवाणा वाटणार नाही. कारण रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एक खास नवी सुविधा मिळणार आहे2 / 12रेल्वे पीएसयू रेलटेल (RailTel) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड (CoD) सेवा या महिनापासूनच सुरू केली जाणार आहे. नव्या सुविधेचा प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. 3 / 12नव्या सुविधेनुसार, प्रवाशांना रेल्वेत प्रीलोडेड मल्टीलिंगुअल कंटेट उपल्बध करुन दिला जाईल. ज्यामध्ये चित्रपट, बातम्या, म्युझिक व्हिडीओ आणि जनरल एन्टरटेन्मेंटचा सहभाग असणार आहे. 4 / 12रेलटेलचे सीएमडी पुनीत चावला यांनी दिलेल्य़ा माहितीनुसार, बफर फ्री सेवा निश्चित करण्यासाठी मीडिया सर्व्हर रेल्वेच्या डब्यात ठेवलं जाईल. प्रवासी धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाईसमध्ये हाय क्वालिटी असणारे बफर फ्री स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत आणि वेळोवेळी यातील कंटेन्ट अपडेट होत राहील.5 / 12रेल्वेही सुविधा 5 हजार 723 उपनगरी रेल्वे आणि 5 हजार 952 वाय-फाय असणाऱ्या रेल्वे स्थानकांसह 8 हजार 731 रेल्वे गाड्यांमध्ये चालू केली जाणार आहे. एक राजधानी एक्सप्रेस आणि एका पश्चिम रेल्वेतील एसी उपनगरीय रेकमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात आणि परीक्षणाच्या तयारीत आहे.6 / 12रेल्वे आणि रेलटेलमध्ये रेवेन्यूचं शेअरिंग हे 50 – 50 टक्के केलं जाणार आहे. त्यामध्ये पीएसयूला या सुविधेतून कमीतकमी 60 कोटी रुपयांचं वार्षिक उप्तन्न मिळणार असल्याची आशा आहे. 7 / 12रेलटेलने रेल्वे आणि रेल्वे स्थानकावर CoD सुविधा प्रदान करण्यासाठी झी एन्टरटेन्मेंटची सहाय्यक कंपनी मार्गो नेटवर्क्ससोबत भागिदारी केली आहे. यी योजना दोन वर्षात कार्यान्वित केली जाणार आहे. 8 / 12कंटेन्ट पेड आणि अनपेड फॉरमॅटमध्ये 10 वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वेने प्रवास करताना मजा येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 12कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने अजब निर्णय घेतलाय. मध्य रेल्वेने आता मुंबई मेट्रोपोलियन रिजन म्हणजेच MMR रिजनमधील प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 5 पटीनं वाढवली आहे. 10 / 1210 रुपयांना मिळणारं प्लॅटफॉर्म तिकीट आता 50 रुपयांना मिळणार आहे. कोरोनाची वाढती संख्या पाहता उन्हाळ्याच्या मोसमात प्लॅटफॉर्म होणारी गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वने हे पाऊल उचललं आहे. 11 / 12मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटासाठी आता 50 रुपये मोजावे लागणार आहेत. 12 / 12मे महिन्यात मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर शहराबाहेर जाणाऱ्या रेल्वेगाड्यांसाठी गर्दी होत असते. त्यामुळे कोरोनाचा काळ लक्षात घेऊन गर्दी टाळण्यासाठी तिकीटाची किंमत वाढविण्यात आल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. हे नवे दर 15 जूनपर्यंत लागू राहणार असल्याचंही जाहीर करण्यात आलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications