Indians losing 5 years of life due to air pollution shocking report of pollution in country
सावधान..! ५ वर्षे कमी जगणार आपण, धक्कादायक अहवाल काय सांगतो पाहा... By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 8:50 AM1 / 9१३० कोटी भारतीयांपैकी बहुतांश भारतीय अशा प्रदूषित वातावरणात राहतात ज्या ठिकाणी वार्षिक प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मर्यादेहून कैकपटींनी अधिक असते2 / 9हवेतील प्रदूषणामुळे जगभरात आयुष्यमर्यादा सरासरी २.२ वर्षांनी घटत आहे. म्हणजेच धूम्रपान, मद्यपान, प्रदूषित पाणी यांच्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांहून तिपटीने, एचआयव्ही मृत्यूंपेक्षा सहापटीने आणि दहशतवादामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांपेक्षा ८९ पटीने प्रदूषणामुळे अधिक मृत्यू होतात.3 / 9६३% भारतीय अशा कायमस्वरूपी प्रदूषित वातावरणात राहतात.4 / 9गंगेच्या खोऱ्यात ५१ कोटी भारतीयांचा निवास आहे. या भागातील प्रदूषणाची पातळी आता आहे तशीच राहिली तर येथील नागरिकांचे आयुष्यमान साडेसात वर्षांनी घटण्याची भीती आहे.5 / 9कोरोनाकाळातील प्रदूषण आणि सद्य:स्थिती यांची तुलना या अहवालात करण्यात आली आहे. कोरोनाकाळात देशात प्रदूषणाची पातळी घटली होती. 6 / 9कोरोनाकालीन निर्बंधांमुळे तसे झाले होते. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर प्रदूषणाच्या पातळीने पुन्हा कोरोनापूर्व स्थिती गाठली आहे7 / 9नवी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, हरयाणा, छत्तीसगड, त्रिपुरा, राजस्थान8 / 9बांगलादेश , भारत , नेपाळ , पाकिस्तान , काँगो9 / 9एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूट ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो (एपिक) यांनी हा अहवाल तयार केला आहे. एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स, असे अहवालाचे नाव आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications