शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प! आता बायरोड कारने बँकॉकला जा; कसा असेल महामार्ग?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 7:24 PM

1 / 10
थायलंडसारख्या सुंदर देशात हवाई उड्डाण घेऊन जाण्याऐवजी रस्त्याने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. खरे तर भारत-म्यानमार आणि थायलंड यांना जोडणारा बहुप्रतिक्षित त्रिपक्षीय महामार्ग येत्या ४ वर्षांत तयार होईल.
2 / 10
मिळालेल्या माहितीनुसार, हायवेचं भारतीय आणि थायलंड भागाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे.1360 किमी लांबीचा भारत-म्यानमार-थायलंड त्रिराष्ट्रीय महामार्ग हा भारत, म्यानमार आणि थायलंडचा संयुक्त प्रकल्प आहे.
3 / 10
भारत म्यानमारमध्ये त्रिराष्ट्रीय महामार्गाचे दोन भागात बांधकाम होणार आहे. यामध्ये 120.74 किमी कलेवा-यागी रस्ता भाग आणि 149.70 किमी तामू-क्यगोन-कलेवा (TKK) रस्ता विभागावरील अप्रोच रस्त्यालगत 69 पुलांच्या बांधकामाचा समावेश आहे.
4 / 10
नोव्हेंबर 2017 मध्ये TKK विभागासाठी आणि मे 2018 मध्ये कलेवा-यागी विभागासाठी काम देण्यात आले. त्यावेळी दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याचे वेळापत्रक काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत निश्चित करण्यात आले होते.
5 / 10
या दोन्ही प्रकल्पांना भारत सरकार म्यानमार सरकारला ग्रांट-इन-एड अंतर्गत निधी देत ​​आहे. अलीकडेच कोलकाता येथे BIMSTEC देशांची (बांगलादेश, भूतान, भारत, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड) दोन दिवसीय परिषद झाली. याच परिषदेत सहभागी झालेल्या म्यानमार आणि थायलंडमधील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्ते प्रकल्पाचे काम येत्या तीन ते चार वर्षांत पूर्ण होणार असल्याची माहिती दिली.
6 / 10
महामार्गाच्या भारतीय आणि थायलंड भागांचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे, तर म्यानमारमधील बांधकाम असामान्य परिस्थितीमुळे रखडले आहे. 2026 च्या अखेरीस अपूर्ण भाग तसेच अपग्रेडेड स्ट्रेच पूर्ण होण्याची आशा मंत्र्यांनी व्यक्त केली.
7 / 10
थायलंड-म्यानमार सीमेवर स्थित बँकॉक ते मॅई सोट या महामार्गाचं थायलंडमधील टप्पा जवळजवळ पूर्ण झाला आहे, असे थायलंडचे परराष्ट्र व्यवहार उपमंत्री विजावत इस्राभाकडी यांनी सांगितले. हा ५०१ किलोमीटरचा रस्ता जवळपास तयार झाला आहे. तसेच आशियाई महामार्ग-१ चा एक भाग आहे.
8 / 10
सध्या महामार्गाच्या खांद्याचे डांबरीकरण करणे आणि बाजूला झाडे-फुलांची झाडे लावणे आणि काही भागात दुभाजक टाकणे अशी किरकोळ कामे सुरू आहेत. हे सर्व लवकरच संपेल. त्रिपक्षीय महामार्ग कोलकातापासून सुरू होतो, उत्तरेला सिलीगुडीपर्यंत जातो
9 / 10
भारत सरकारने हाती घेतलेला हा सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ईशान्येकडील प्रदेशाची अर्थव्यवस्था सुधारेल. ईशान्य प्रदेश आणि म्यानमार, थायलंड, हाँगकाँग आणि सिंगापूरसह इतर आशियाई देशांमधील लोकांमध्ये कनेक्टिव्हिटी सुधारेल.
10 / 10
सामरिक दृष्टिकोनातून, म्यानमार आणि थायलंडसारख्या भारताच्या शेजारी देशांशी संबंध सुधारण्यास मदत होईल, विशेषत: चीनला लक्षात ठेवून या प्रकल्पामुळे ईशान्येकडील भागात कनेक्टिव्हिटी वाढेल.
टॅग्स :IndiaभारतMyanmarम्यानमार