India's gold imports increase; What is the current price of gold and silver?, lets know
Gold- Silver Rates: भारतात सोन्याची आयात वाढली; सोने-चांदीचा आजचा भाव किती?, जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 11:39 AM1 / 5आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,४५० रुपये आहे. 2 / 5गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६९,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.3 / 5भारतात सोन्याच्या आयातीमुळे चालू आर्थिक वर्षात ११ महिन्यात म्हणजे एप्रिल - फेब्रुवारीमध्ये ७३ टक्के वाढले असून ४५.१ अरब डॉलरपर्यंत पोहोचले आहे. मागणी वाढल्याने सोन्याची आयात वाढली आहे. यामुळे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोन्याची आयात २६.११ अब्ज डॉलर होती.4 / 5विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. 5 / 5लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. आणखी वाचा Subscribe to Notifications